संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
11-08-2024
Gadchiroli Murder Case: गडचिरोली, 9 ऑगस्ट - कुरखेडा तालुक्यातील चिखली गावात 28 वर्षीय युवक जितेश पगडवार यांच्या हत्या प्रकरणाने गावात हळहळ व्यक्त केली आहे. जितेशचा मृतदेह चिखली-वडेगाव मार्गावर आढळून आला असून, प्राथमिक तपासानुसार हत्या मोबाइल चोरीच्या संशयावरून झाल्याचे समोर आले आहे.
जितेश पगडवार आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वीपासून मोबाइल चोरीच्या संशयावरून वाद सुरू होता. गुरुवार, 8 ऑगस्ट रोजी रात्री हा वाद विकोपाला गेला, जेव्हा आरोपींनी जितेशला वडेगाव रस्त्यावर गाठून, लोखंडी सळईने डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे.
आरोपींमध्ये जितू ऊर्फ विशाल पिसोरे (19), वैभव सहारे (19), आणि अमन पठान (20) या तिघांचा समावेश आहे. हे तिघेही चिखलीचे रहिवासी आहेत आणि मित्र आहेत. जितू ऊर्फ विशालचा मोबाइल काही दिवसांपूर्वी हरवला होता, आणि तो जितेशने पळविल्याचा संशय आरोपींना होता. या संशयातूनच हत्येचा कट रचला गेला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.
हे देखील वाचा : Baby Aadhar Card: बाळ जन्मत:च करा आधार नोंदणी, नाही तर मिळणार नाही या योजनेचा लाभ
जितेश पगडवार हा अविवाहित होता आणि रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामपंचायतीत संगणक परिचालक असलेल्या मोठ्या भावावर आता कुटुंबाची जबाबदारी आली आहे.
कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असून, आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
अशाच बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments