अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
24-08-2024
ST Mahamandal: एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीकडून शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 ऑगस्टला बैठक आयोजित केली होती. परंतु ही बैठक काही कारण सांगून पुढे गेल्याने एसटी कामगार संतापले. कृती समितीच्या नेतृत्वात एसटी कामगारांनी नागपूरात रस्त्यावर उतरून पुन्हा मागण्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीकडून शुक्रवारी गणेशपेठ आगार परिसरात द्वारसभा घेण्यात आली.
या आंदोलनात एसटीच्या सुमारे 13 संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. एस. टी. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या व एस. टी. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांएवढे करण्यासाठी राज्यातील बहुतांश संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली. या मागण्यांसाठी 3 सप्टेंबरला आंदोलनाचा निर्णय झाला आहे. त्याबाबत एसटी प्रशासनाला नोटीसही बजावण्यात आली आहे.
7 ऑगस्टला दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कामगारांना न्याय देण्याची घोषणा करावी. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास 3 सप्टेंबरपासून राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल. गणेशोत्सवादरम्यान प्रवासी वाहतूकीचा खोळंबा झाल्यास शासन जबाबदार राहील. असा इशारा एस टी कामगारांनीं दिलेला आहे. अजय हट्टेवार, महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समिती.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments