संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
22-08-2024
Ladka Shetkari Yojana: शेतकऱ्याला थेट मार्केट उपलब्ध करून देण्याचं महायुती सरकारचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.
सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहिणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षांनी संपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत.
शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे.
हे देखील वाचा : Biofortified: उत्पादन वाढविणारे आणि खर्च कमी करणारे 109 बियाणे बाजारात
आता आपण ई-पीक पाहणी वगेरे बाजूला ठेवणार आहोत.. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे, त्या शेतकऱ्यांना मदत देणार आहोत. एवढंच नाही तर शेतीपंपाची वीज बिलंही माफ करत आहोत. मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत", असंही मुख्यमंत्री शिंदे . यावेळी म्हणाले.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments