बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
31-05-2024
Gadchiroli News: गडचिरोली मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतामान वाढत आहे. मागील आठवड्यापासून तर उन्हाच्या तीव्र झळा व उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच गुरुवार, 30 मे रोजी रोजी या हंगामातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
मागील आठवड्यापासूनच उष्णतेचा पारा वाढत आहे. सकाळी 8 वाजेपासूनच तीव्र उन्ह पडते. या तीव्र उन्हामुळे नागरिक घरातून बाहेर पडण्यास धजत नाही. सकाळी 11 वाजता तर असह्य उकाडा जाणवतो. दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान रस्ता सामसुम होतो.
1. उष्माघाताचा धोका
वाढत्या तापमानात बाहेर पडल्यास उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अधिक काळ उन्हात राहणे टाळावे, अन्यथा उष्माघात होण्याचा धोका असतो. दिवसातून आवश्यकतेनुसार पाणी पीत राहावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
हे देखील वाचा : Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मी में निकली इन पदों के लिए भर्ती
2. पशुधनालाहि जपा
जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था करावी. सावलीमध्ये निवायाची व्यवस्था करावी. बैल व इतर जनावरांकडून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेदरम्यान काम करणे टाळावे. गोठ्याच्या शेडला पांढरा रंग द्यावा. शक्य असल्यास शेडमध्ये पाण्याचा फवारा व फोगर्स लावावे. जास्त उष्णतेच्या काळात जनावरांच्या अंगावर पाणी फवारावे. जनावरांच्या आहारात हिरवा चारा, प्रथिने, खनिज मिश्रण व मिठाचा समावेश करावा, अशी काळजी घ्यावी.
3. ग्रामीणमध्ये शेतीच्या मशागतीची कामे प्रभावित
जिल्ह्यात सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत; परंतु सकाळी 8 वाजेपासूनच उकाडा, त्यानंतर उन्हाच्या झळा लागतात. यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे प्रभावित होत आहेत. शेतकरी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंतच दोन तास कामे करताना दिसत आहेत.
4. शहरात दिवसभर विजेचा लपंडाव
मागील आठवड्यापासून पारा 40 ते 43 अंशातच कायम होता; परंतु आता तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. अशातच दिवसभर विजेचा लपंडाव असल्याने उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments