नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
21-05-2024
Bachchu Kadu : ऑनलाईन रमीच्या जाहिरातीवरुन मागच्या काही दिवसांपासून सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar आणि प्रहार चे प्रमुख बच्चू कडू Bachchu Kadu यांच्या मध्ये मोठा वाद सुरु आहे. पण आता पुन्हा एकदा बच्चू कडू सचिन तेंडुलकर च्या विरोधात आक्रमक झाले आहे. काही दिवसा पूर्वी सचिन तेंडुलकर च्या बॉडीगार्ड ने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आता त्यावरून बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर ला घेरलं आहे. सचिन तेंडुलकरने भारतरत्न वापस करावा नाही तर त्याच्या घरासमोर मोठा आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू Bachchu Kadu यांनी दिला आहे. सचिन तेंडुलकर चा बॉडीगार्ड प्रकाश कापडे याने ऑनलाईन रामाच्या व्यसनातून आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे मूळ गावी प्रकाश कापडे यांनी आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नव्हते. न आता बच्चू कडू Bachchu Kadu यांनी आरोप केल्यामुळे आणखी माहिती समोर अली आहे. ऑनलाईन रमीच्या व्यसनामुळे आलेल्या कर्जबाजारीमुळे प्रकाश कापडे Prakash kapade यांनी आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू नि केला आहे.
हे देखील वाचा : Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मी में निकली इन पदों के लिए भर्ती
प्रकाश कापडे Prakash kapade यांच्या आत्महते ने बच्चू कडू नी संताप व्यक्त करत Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर चा निषेद केला आहे. सचिन तेंडुलकर ने केलेल्या जाहिरातीमुळे प्रकाश कापडेंचा जीव गेला आहे असा आरॊप करत त्याने भारतरत्न वापस करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. पुरस्कार वापस नाही केला तर 6 जून किंवा 7 जून ला सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar चा पुतळा जाळून आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडूंनी Bachchu Kadu दिला.
जो बॉडीगार्ड सचिन तेंडुलकरचा जीव वाचवण्याचा काम करत होता, त्याच बॉडीगार्ड ला सचिन तेंडुलकर करत असलेल्या जाहिरातीमुळे जीव गमावला आहे. अंगरक्षकावर आत्महत्या करण्याची वेळ आली असेल तर तेंडुलकर ने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. आपण ज्याला भारतरत्न म्हणून गौरविले त्याच्याच जाहिरातीमुळे आत्महत्या करावी लागत असेल तर हे दुर्दैव्य आहे असे बच्चू कडू यांनी म्हणाले.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments