STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
29-02-2024
Gadchiroli : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या 20 टक्के शेष फंडातून (remaining funds) मागावर्गीयांसाठी 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन दिली जाते. सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची 31 मार्चपर्यंत आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीयांसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. सदर योजनेचा लाभ घेऊन मागासवर्गीय लाभार्थी आपले जीवनमान उंचावू शकतात. 20 टक्के शेष फंडातून
झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन वितरित केली जाणार असल्याने अनेक लाभार्थीनी लाभ घेण्याकरिता अर्ज सादर केले आहेत. सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थीना दिला जाणार आहे. यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. छाननीनंतर व उपलब्ध अनुदानानुसार लाभार्थी निवड केली जाईल.
जिल्हा परिषदेकडून अनुदान Grant from District Council :
स्प्रिंकलरसाठी 90 टक्के अनुदान : कृषी विभागाच्या वतीने शेतकयांना शेतोपयोगी विविध साहित्याचे वितरण केले जाते. यापैकीच तुषार सिंचनासाठी दिले जात आहे.
झेरॉक्स मशीनसाठी किती अनुदान
झेरॉक्स मशीन खरेदीसाठी मागासवर्गातील व्यक्तीला 70 हजार 500 रुपयांचे अनुदान दिले जाते. सदर अनुदान शेष फंडातून दिले जात असल्याने लाभार्थी निवडीची प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पाडली जाते.
शिलाई मशीनसाठी 5,700 रुपये
शिलाई मशीनचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मशीन खरेदीसाठी 5 हजार 700 रुपयांचे अनुदान दिले जाते. या लाभासाठीसुद्धा दरवर्षी अनेक महिला अर्ज सादर करून अनुदानाचा लाभ घेतात.
निकष काय?
अर्जदार मागासवर्गीय असावा, त्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. अर्जदार 18 ते 65 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. प्रथम येणाच्या अर्जांना प्राधान्य देऊन लाभार्थीची निवड केली जाणार आहे.
ही कागदपत्रे गरजेची
झेरॉक्स मशीन किंवा शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका, रहिवासी पुरावा, लाभार्थी गरजू किंवा बेरोजगार असल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे. आधार कार्ड, ग्रामसभेचा ठराव, सोबतच शाळा सोडल्याचा दाखला, बैंक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
31 मार्चपर्यंत करा अर्ज : 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी मागा- सवर्गातील इच्छुकांना ३१ मार्चपर्यंत अर्ज
सादर करावे लागणार आहे. सदर योजनेच्या माध्यमातून बेरोज़गार युवांना आपला रोजगार थाटता येईल.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments