ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
29-06-2024
दक्षिण आफ्रिका जिंकायला पाहिजे , पण...! Shoaib Akhtar यांचं फायनलपूर्वी मोठं भाकित
IND vs SA Live Scorecard : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ब्रिजटाऊन येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची फायनल होणार असुन भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमधील ११ वर्षांचा जेतेपदासाठी सज्ज झाला आहे, तर आफ्रिकेला प्रथमच आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. रोहित अँड कंपनी त्याला विजयी निरोप देण्यासाठी सज्ज आहे. रोहित व विराट कोहली या सीनियर खेळाडूंचा कदाचित हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याने, त्यांनाही जेतेपदाचा चषक खुणावतोय. वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनच टीम इंडिया जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर होतीच. पाकिस्तानचे आव्हान पहिल्याच फेरीत संपले, तर ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ सुपर ८ मध्येच बाहेर पडला. अफगाणिस्तानने अचंबित करणारी कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. गतविजेत्या इंग्लंडला नमवून भारत फायनलमध्ये पोहोचला.
भारताने २०१३ नंतर आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही आणि ११ वर्षांचा दुष्काळ आज संपेल अशी आशा सर्वांना आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कप फायनल खेळतेय आणि त्यांना यश मिळाले पाहिजे, असं भाकीत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यांनी वर्तवीला आहे. त्यांचं भाकीत कितपत योग्य होणार ते कोण जिंकतेय त्यावर ठरेल.
तो म्हणाला, मला मनापासून वाटतं की दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड कप जिंकायला हवं. बऱ्याच वर्षानंतर ते फायनल खेळत आहेत. त्यांच्याकडे मोठे खेळाडू होते, परंतु त्यांना इथपर्यंत कधी पोहोचता आले नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला वाटतं की त्यांनी जिंकावे. पण, त्यांच्यासमोर भारतीय संघ आहे. २००७ नंतर भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही, त्यांनाही वर्ल्ड कप उंचावून बराच काळ झाला आहे आणि हा वर्ल्ड कप ते जिंकतील.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments