निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
24-12-2024
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुपरहीट ठरली असून, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक मदतीसोबतच विविध सुविधा दिल्या जात आहेत. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती, आणि यामुळे महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाला आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यासोबतच, सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लाडक्या बहिणींना घरकूल योजनेचाही लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने घरकूल योजनेतून महिलांना लाभ देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. pradhanmantri awas yojna पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 13 लाखांपेक्षा अधिक महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. यावर्षीच 20 लाखांपेक्षा जास्त घरं सर्वसामान्य नागरिकांना वितरित करण्याचा निर्धार केला आहे.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुण्यात राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, ज्या कुटुंबांकडे दुचाकी वाहन आहे, त्यांनाही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर मिळणार आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील महिलांसाठी हक्काच्या घराची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य, आणि आता घरकूल योजनेचा लाभ, यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments