बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
16-11-2024
School Holiday News: राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. या निमित्ताने राज्यभर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवस सुट्टी लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत शालेय शिक्षण विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे की, 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी घोषित करण्यात आलेली नाही. सर्व शाळा नियमित सुरू राहतील. या संदर्भात शिक्षण विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट निर्देश दिले आहेत.
शिक्षण विभागाच्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, "ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणुकीसाठी करण्यात आली आहे आणि त्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपस्थित राहू शकणार नाही, अशा शाळांसाठी स्थानिक पातळीवर मुख्याध्यापकांना सुट्टी घोषित करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, अशा शाळा वगळता इतर सर्व शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहतील."
20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी शाळा बंद असतील, कारण त्या दिवशी मतदान केंद्रे शाळांमध्येच असतील.
यामुळे पालकांनी 18 आणि 19 नोव्हेंबरच्या सुट्टीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments