ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
04-08-2024
Auto Rickshaw Yojana: राज्य शासनाने महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून अनेक चालकांना आरोग्यविषयक सुविधा व अर्थसाहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात ऑटोरिक्षा मोठ्या प्रमाणात धावतात. शेकडो चालकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असून रोजगार उच्चशिक्षित विद्यार्थीही नोकरी मिळाली नाही म्हणून खचून न जाता ऑटो रिक्षाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय निवडतात.
रात्री-बेरात्री प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहचविण्याचा प्रयत्न करतात. मात्र सध्या ऑटोरिक्षांची संख्या वाढली असून, प्रवासी घेण्यासाठी मोठी स्पर्धा वाढली आहे.
शासनाने ऑटो रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन केल्याने या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
रिक्षाचालकांना विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचा रिक्षाचालकांना लाभ होणार आहे.
जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत, तर अप्पर पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य तर नोंदणीकृत ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालक संघटनेचे प्रतिनिधी अशासकीय सदस्य, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार.
हे देखील वाचा : Top 10 Vastu Tips For Home : इन 5 आदतों से घर में रहती है नकारात्मक ऊर्जा
आरोग्य विमा केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यात जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ मिळेल.
कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजारांपर्यंत अर्थसाहाय्य मिळणार आहे. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना राबविण्यात येणार आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments