नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
08-11-2024
Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" सुरु केली होती, ज्यात पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. आता या दरम्यान एक चर्चेचा विषय बनला आहे की डिसेंबर महिन्यात 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. खरंच असं होणार आहे का? सविस्तर जाणून घेऊया.
कोल्हापूरमधील शिरोळ येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, "ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये पैसे जमा होतील. विरोधक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. आम्ही लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यात आम्ही काय पाप केलं?"
आतापर्यंत महिलांना 1500 रुपये दिले जात होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी एक मोठा ऐतिहासिक घोषणा केली आहे, "निवडणुकीनंतर आमचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करुन दरमहा 2100 रुपये दिले जातील.
मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर महिन्यातील सहाव्या हफ्त्याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, "आचारसंहितेमुळे लाडकी बहिणींच्या पैशात विलंब होऊ नये म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी आहे आणि निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. निकालानंतर आम्ही डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच देणार आहोत.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments