रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
15-09-2024
New Moon: आकाशातील सौरमालेत पृथ्वीसोबत इतर अनेक ग्रह आहेत, जसे की गुरु, शुक्र, शनी इत्यादी. प्रत्येक ग्रहाभोवती फिरणारे चंद्रही आहेत. शनीभोवती तर तब्बल 146 चंद्र आहेत, परंतु पृथ्वीभोवती केवळ एकच चंद्र आहे. पण, लवकरच एका दुर्मीळ खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला दोन महिन्यांसाठी आणखी एक मिनी चंद्र मिळणार आहे.
अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. 7 ऑगस्ट 2024 रोजी या मिनी चंद्राचे पहिले दर्शन झाले, ज्यामुळे खगोल शास्त्रज्ञांना मोठी आशा मिळाली आहे.
हे देखील वाचा : OYO Rooms: OYO Rooms क्यों है कपल्स की पहली पसंद?, जानिए क्या है इसके पीछे की वजह
खगोल संशोधकांनी या अहवालात स्पष्ट केले आहे की, अवकाशातील कोणतीही वस्तू जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येते, तेव्हा ती घोड्याच्या नालेसारख्या मार्गाने फिरते. ती वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण पूर्ण करत नाही, परंतु काही काळासाठी गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली राहते आणि नंतर आपल्या मार्गाने पुढे जाते. याच घटनेला 'मिनीमून' असे म्हणतात, आणि खगोल अभ्यासकांसाठी ही एक अद्भुत संधी असते.
हा चमत्कार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडणार आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 या काळात एक लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येणार आहे. या लघुग्रहाचे नाव 2024पीटी5 असे आहे, आणि तो काही काळ पृथ्वीभोवती फिरणार आहे, परंतु परिभ्रमण पूर्ण करण्याआधीच तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल. 25 नोव्हेंबरनंतर हा लघुग्रह पुन्हा सू्र्याभोवती परिभ्रमण सुरु करेल.
हा मिनी चंद्र आपल्या मूळ चंद्रासारखा मोठा आणि चमकदार नसेल. याचा व्यास फक्त 10 मीटर इतका असणार आहे, त्यामुळे तो डोळ्यांनी किंवा टेलिस्कोपने सहज दिसणार नाही. तो लघुग्रहाच्या स्वरूपात असणार असून खगोल अभ्यासकांसाठी मात्र हा एक महत्त्वाचा अभ्यासाचा विषय ठरणार आहे.
होय, याआधीही पृथ्वीवर मिनी मून आल्याचे नोंद आहे. 1981 आणि 2022 मध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या, पण आकाराने लहान असल्याने आणि वेगाने फिरत असल्याने त्यांना ओळखणे कठीण होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments