बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
22-08-2024
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024: राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत "मुख्यमंत्री योजना दूत" या पदांसाठी 50,000 उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या योजनेंतर्गत राज्य शासन विविध योजना दूतांची भरती गाव व शहर पातळीवर करणार आहे, ज्यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांची अधिक माहिती मिळेल.
योजनादूत म्हणून काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. निवड झालेल्या योजनादूतांना राज्य शासनाकडून प्रतिमाह 10,000 रुपयांचे मानधन देण्यात येईल.
प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत तर शहरी भागातील प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे एक योजनादूत नियुक्त केला जाणार आहे. या योजनादूतांच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल व त्यामुळे कोणताही लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही.
योजनादूत हे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून काम करतील. त्यांच्या प्रमुख कामांमध्ये नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधणे, आणि दिवसभरातील कामांचा अहवाल ऑनलाइन अपलोड करणे यांचा समावेश आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र, अधिवास दाखला, पासपोर्ट साइज फोटो, बँक खात्याचा तपशील, आणि हमीपत्र यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागतील.
मुख्यमंत्री योजना दूत पदासाठी इच्छुक उमेदवारांनी "महास्वयंम" पोर्टलवर भेट देऊन अर्ज सादर करावा. याच पोर्टलवर अर्जाची पुढील प्रक्रिया देखील पार पाडली जाईल.
योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा. उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच त्याला संगणकाचे ज्ञान, अद्ययावत मोबाइल व बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, असेही निकष घालण्यात आले आहेत.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments