निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
10-08-2024
Nagpur News: नागपूर पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत चिटिंग करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले असून यात पोलिस उपनिरीक्षकासह तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार होणार नाही असा दावा पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता.
मात्र असा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जुलै महिन्यात पोलिस भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. 28 जुलै रोजी वानाडोंगरीतील दोन महाविद्यालयांत परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या एक दिवस अगोदर परीक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती व कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
विशेष शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण तसेच गिट्टीखदान पोलिस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल संतोष फकुंडे व जरीपटक्यातील कॉन्स्टेबल सिद्धार्थ लोखंडे यांना वानाडोंगरीतील वायसीसीईमधील एका परीक्षा कक्षात पर्यवेक्षक व सहायक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. लेखी परीक्षा पूर्ण झाल्यावर त्या कक्षात गैरप्रकार झाल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली.
यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात उमेदवारांनी एकमेकांशी चर्चा करत उत्तरे दिल्याची बाब समोर आली.
पोलिस कर्मचारी उपस्थित असतानादेखील चीटिंग झाल्याची बाब गंभीरतेने घेण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशावरून तिघांनाही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. जर या कालावधीत ते इतर कुठली नोकरी किंवा व्यापार करताना आढळले तर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments