बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
27-10-2024
Gadchiroli News: गडचिरोली येथील मतदारसंघात भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांची उमेदवारी कापली. त्यांच्याऐवजी भाजप आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे Dr. Milind Narote यांच्या रूपाने महायुतीने नवा चेहरा मैदानात उतरविला आहे. आता डॉ. नरोटे यांच्या समोर महाविकास आघाडीकडून आखाड्यात कोण येणार, याचीच प्रतीक्षा आहे. ऑक्टोबरला सायंकाळी डॉ. नरोटे यांच्या Dr. Milind Narote उमेदवारीची घोषणा होताच भाजपच्या एका गटात आनंदोत्सव, तर डॉ. होळी समर्थकांत अस्वस्थता पाहावयास मिळाली.
भाजपने 20 ऑक्टोबरला 19 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात आरमोरीतून आमदार कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली, पण गडचिरोलीचा निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी समर्थकांची धाकधूक वाढली होती. अखेर भाजपने 'हरियाणा पॅटर्न'चा अवलंब करीत आमदार होळी यांना बाजूला सारून डॉ. मिलिंद नरोटे Dr. Milind Narote यांना उमेदवारी जाहीर केली.
त्यामुळे डॉ. होळी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर माजी खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी अशोक नेते, डॉ. मिलिंद नरोटे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजप सहकार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, आदी उपस्थित होते.
डॉ. मिलिंद नरोटे हे मूळचे रेखेगाव (ता. चामोर्शी) येथील रहिवासी आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले मिलिंद नरोटे हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2013 मध्ये धानोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले.2018 मध्ये गडचिरोलीत स्वतःचे हॉस्पिटल सुरु केले. 2021 मध्ये त्यांनी स्पंदन फाऊंडेशनची स्थापना केली व समाजकारणात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून ते भाजपशी जोडले गेले.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments