ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
28-06-2024
Sarkari Yojana 2024: मुंबई राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर होणार असून, छोट्या व मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज, महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलिंडर मोफत, आदी लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निर्णयांसाठी आग्रही होते.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Mukhyamantri Annapurna Yojana राबविली जाईल, त्यानुसार दरवर्षी भरलेले तीन गॅस सिलिंडर महिलांना मोफत दिले जातील. दोन कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल. अल्पभूधारक व मध्यम भूधारक 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. 8.5 लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप दिले जातील.
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन
मुख्यमंत्री Ladli Behna Yojana मध्य प्रदेशच्या धर्तीवर जाहीर केली जाईल. या योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 1 कोटी 37 लाख महिलांच्या थेट बँक खात्यात महिन्याकाठी 1,250 रुपये जमा केले जातात. महाराष्ट्रात हा लाभ वय वर्षे 24 ते 60 पर्यंतच्या 3 कोटी 50 लाख महिलांना दिला जाणार आहे. महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जातील. महिलांना आर्थिक, सामाजिक हातभार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठीची ही योजना असेल.
मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेंतर्गत Mukhyamantri Yuva Kaushal Yojana बारावी पास युवक- युवतींना मासिक 7 हजार रुपये, ITI डिप्लोमाधारकांना मासिक 8 हजार रुपये, तर पदवीधरांना मासिक 10 हजार रुपये किमान सहा महिन्यांसाठी देण्यात येतील. 18 ते 29 वर्षे वयोगटाला त्याचा लाभ मिळेल.
अर्थमंत्री अजित पवार Finance Minister Ajit Pawar या अर्थसंकल्पात आणखी काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे. लोकसभा Lok Sabha elections निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका, चार महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत assembly elections. विजय मिळविण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर हे 'इलेक्शन बजेट' ठरू शकेल.
प्रामुख्याने महिला व बालविकास, ग्रामविकास, women and child development सामाजिक न्याय, आदिवासी विकास, आरोग्य या क्षेत्रांना झुकते माप दिले जाईल. बहुजन समाज व बारा बलुतेदारांच्या कल्याणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विविध सामाजिक महामंडळांसाठीचा निधी याबाबत काही तरतुदी असतील.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments