नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
25-12-2023
सतांपलेल्या शेतकर्यांचा जाहीरपणे निषेध.
चिमूर : पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्यासाठी अनेक शेतकरी २५ वर्षांपासून सतत मागणी करत आहे.या रस्त्याच्या मागणीसाठी सन २०२० पासून भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर - वरोरा तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम सातत्याने पाठपुरावा करत आहे, शासन व इतर कोणीही या मागणीकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या पुढाकाराने दिनांक २३ रविवारी सकाळी आंदोलन स्थळी जिल्हाधिकाऱ्यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध केला.
वरोरा तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम वरोरा विभाग, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आमदार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री या सर्वाना सातत्याने पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरवला या रस्त्याला वि.आर नबंर व रस्त्याच्या मंजुरीची मागणी करत आहे.पण या मागणीकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.त्यामुळे ७ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन येथे मुख्यमंत्री यांचे प्रधान विकास करणे यांना या रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन सादर केले होते.
या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मागणी पुर्ण करा असे निर्देश दिले होते.परंतु जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी याकडे विशेष लक्ष दिले नाही व शेतकऱ्यांनी या संबंधात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने १९ डिसेंबर २०२३ पासून पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्याला वि.आर नबंर व रस्त्याला मंजुरी देण्यात यावी भीम आर्मी संरक्षक च्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी " बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर " नावाचे धरणे आंदोलन दिवसा व कडाक्याच्या थंडीत रात्री येथील शिवबंधाऱ्या जवळ सुरू केले आहे. परंतु अजूनही या मागणीकडे शासन लक्ष देत नसल्याने शेतकरी आक्रमकपणे सरकारचा निषेध व्यक्त केला अशा घोषणा देत आज २४ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आंदोलन स्थळी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करुन पुतळा जाळला ,
शेतकऱ्यांना रस्त्याच्या मागणी करीता आंदोलन करावे लागत असेल तर " शासन आपल्या दारी " असा प्रश्न गिरोला, आबमक्ता, येरखेडा,माकोणा, पाजरेपार रीठ, या परीसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्याला वि.आर नबंर देऊन रस्ता मंजुरी देण्यात यावा मागणी करत याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र होत जाणार असून या मागणीकडे लक्ष न दिल्यास वरोरा भद्रावती आमदार जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांचेही पुतळे जाण्याचा इशारा शेतकरी व भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी दिला आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments