समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
20-07-2024
Chandrapur News :- मागील २-३ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे, सतत सुरू असलेल्या पावसाने ग्रामीण व शहरी जीवन विस्कळीत केले आहे, नागभीड तालुक्यात दोघेजण पुरात वाहून गेले यामध्ये एकाचा मृतदेह प्रशासनाला मिळाला आहे.
२० जुलैला सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, जिल्ह्यातील सर्वात मोठे इरई धरण धोक्याची पातळी गाठत असता प्रशासनाने धरणाचे ३ दरवाजे ०.२५ मीटर ने सुरू केले, पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने नदी पात्र जवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता.
ग्रामीण भागातील वरोरा, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, शेगाव व चिमूर मार्ग पूर्णतः बंद पडला, इरई नदीचे पाणी मोठया प्रमाणात वाहत असल्याने अर्जुनी तुकुम, वायगाव, कोकेवाडा, आष्टा गावात काही प्रमाणात पाणी शिरले, कोरपना तालुक्यातील गाडेगाव, नारंडा व आवळापुर-नारंडा मार्ग पावसाने ठप्प पडला.
ब्रह्मपुरी येथे अतिवृष्टी झाल्याने शहरातील देलनवाडी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे, भिसी-चिमूर येथे पिंपलनेरी नदीला पूर आला, या मार्गावरील पुल पाण्यात बुडाला असून प्रशासनाने वाहनांना वाहतुकीसाठी दुसरा पर्याय सुचवीत वाहतूक सुरू केलेली आहे.
Chandrapur जिल्ह्यातील नागभीड येथे विलम नाल्यात १२ वर्षीय मुलगा वाहून गेला
नागभीड तालुक्यात विलम नाल्यात दोघे वाहून गेले..
नागभीड तालुक्यात दोन व्यक्ती पुरात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याची शोधमोहीम सुरू आहे.
महत्वाची गोष्ट अशी की, या दोन्ही घटना वेगवेगळ्या गावा मधील असल्या तरी एकाच नाल्यावरील आहेत.
पहिली घटना विलम येथे घडली. विलम येथील ॠणाल प्रमोद बावणे वय वर्ष ११ हा मुलगा सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या विलम नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता.
हा मुलगा नाला पार करत असताना या नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला, पण तो असफल झाला.
दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे वय वर्ष ३० हा तरुण सुद्धा गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला.
मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी हालचाल करून प्रयत्न केला. पण परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
अधिक वाचा :- Gadchiroli News :- जनता वाऱ्यावर, पालकंत्र्यांना फ्कत उधोग्यासाठी वेळ
अधिक वाचा :- Today Horoscope :- २० जुलै २०२४ ; नवीन काम करायला दिवस शुभ आहे, धनलाभ होईल
अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा
अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या
अधिक वाचा :- Entertainment News :- बैड न्यूज़ रिव्यू: विक्की कौशल ने फिल्म को 'बचाया'
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments