अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
11-07-2024
चंद्रपूर : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Government Engineering College) मुलींच्या वसतीगृहात २७ विद्यार्थिनी अनधिकृतपणे वास्तव्याला होत्या, अशी धक्कादायक बाब वसतिगृह समितीच्या छाप्यात उघडकीस आली.
विशेष गोष्ट अशी की, वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्राध्यापिका या भाडेकरू विद्यार्थिनींकडून १२ ते १४ हजार रुपये प्रतिमाह भाडे स्वत:च स्वीकारत होत्या. दोन प्राध्यापिकांनी मिळून विद्यार्थिनींकडून आतापर्यंत २ लाख ८८ हजार भाडे वसूल केलेले आहे.
Chandrapur - बल्लारपूर बायपास मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Government Engineering College) आहे. या महाविद्यालयात १५० विद्यार्थिनींचे स्वतंत्र वसतिगृह आहे. या वसतिगृहात महाविद्यालयातील विद्यार्थिनी वास्तव्याला आहेत.
प्रा. रेखा सहारे व सहायक प्राध्यापिका श्रीमती खोब्रागडे या दोघींना वसतिगृहाची जबाबदारी दिलेली आहे. या वसतिगृहात १५० विद्यार्थिनींची क्षमता असताना क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनी वास्तव्याला असल्याची बाब निदर्शनास आली.
त्यामुळे दोन दिवसांपूर्वी वसतिगृह समितीचे अध्यक्ष डॉ. ललीत ढोले, सचिव प्रा. शिशीर पाटील, प्रा. भोवरे प्रा. जामुनकर, व प्रा. मोरे या ५ जणांच्या समितीने रात्री अचानक वसतिगृहात छापा मारला.
संपूर्ण वसतिगृहाची तपासणी केली असता अधिकच्या २७ विद्यार्थिनी येथे राहत असल्याचे उघडकीस आले. या सर्व २७ विद्यार्थिनींचा जबाब व तक्रारी समितीने नोंदविल्या. या सर्व विद्यार्थिनींनी प्रा. सहारे व प्रा. खोब्रागडे यांना १२ ते १४ हजार रुपये भाडे देत असल्याची कबुली दिलेली आहे.
विद्यार्थिनीं कडून प्रा.सहारे व प्रा.खोब्रागडे यांनी आतापर्यंत अवैधपणे २ लाख ८८ हजार रुपये वसूल केल्याचे समितीच्या पाहणीत समोर आलेले आहे.
मागील २ वर्षांपासून हा प्रकार वसतिगृहात सुरू होता, अशी माहिती वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने दिलेली आहे.
या २ प्राध्यापिकां विरुद्ध शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (Government Engineering College) प्राचार्य डॉ. प्रशांत वाशीमकर यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे.
भाडेवसुलीसाठी ५ महिला बाऊंसर
प्राध्यापिकांनी वसतिगृहात अनधिकृपणे वास्तव्याला असलेल्या या मुलींकडून भाडे वसुलीसाठी पाच महिला बाऊंसरची नियुक्ती केली होती.
या सर्व बाऊंसर देखील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या २ प्राध्यापिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉ. वाशीमकर यांच्याकडे केलेली आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. प्रशांत वाशीमकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मागील शैक्षणिक वर्षात देखील ही घटना घडलेली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाला याबाबतची माहिती दिलेली आहे.
मेसमध्येही घोटाळा
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (Government Engineering College) विद्यार्थिनींसाठी मेस आहे. मेस मध्ये जवळपास २५० मुली रोज जेवण करतात, यासाठी प्रत्येक विद्यार्थिनी कडून १७५० रुपये शुल्क आकारले जाते.
तिथेही अशाच प्रकारचा घोळ झालेला आहे. हा संपूर्ण घोटाळा जवळपास ५० लाखांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या प्रकरणाची देखील चौकशी सुरू आहे.
अधिक वाचा :- Today Horoscope :- ११ जुलै २०२४ ; नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर वन विकास महामंडळाचे सहा कर्मचारी निलंबित
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments