CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
10-07-2024
Earthquake News :- नांदेड : आज दिनांक १० जुलै रोजी पहाटे मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. या धरणीकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन समावेश आहे, तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी जिल्ह्या मधील वेगवेगळ्या तालुक्यांत भूकंपाचा धक्का (Earthquake in Parbhani)
जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार १० जुलै सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवलेला आहे.
परभणी शहर, सेलू, गंगाखेड या आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत झाले आणि घराबाहेर आले. भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.
हिंगोली जिल्ह्यामध्ये ही धरणीकंप, जीवितहानी नाही
(Earthquake in Higoli)
हिंगोली जिल्ह्यांत आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५ ही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले.
आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहराला सुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. हिंगोलीत झालेला हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.
वाशिममध्ये नागरिकांत भीती
(Earthquake in Washim)
मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. ७ वाजून ९ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.
सावळी कृष्णा, जयपूर, सोंडा टनका, या गावात परिसरात घरावरील टीन पत्राचा मोठा आवाज झाला. गोठ्यात मध्ये बांधलेली जनावर या भूकंपामुळे भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले. जनावरे रावैरा होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत करत होते. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नांदेड, जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के
(Earthquake in Nanded and Jalna)
मराठवाड्यातील नांदेड तसेच जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी ७.१५ वाजता हे धक्के जाणवले. तर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
अधिक वाचा :- Today Horoscope :- ९ जुलै २०२४ ; आज महत्वाचे निर्णय न घेतल्यास बर होईल
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूमध्ये काँगेसला विधानसभेचा उमेदवार मिळाला
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments