ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
02-07-2024
नागपूर : भूमिगत पार्किंगमुळे स्मारक आणि बोधीवृक्ष धोक्यात येण्याची शक्यता असल्याने Nagpur दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली.
भूमिगत पार्किंग नको आहे? असाच आक्रमक पवित्रा घेत सोमवारी राज्यभरातील हजारो आंबेडकरी समाजाच्या लोकांनी Nagpur दीक्षाभूमीवर हल्लाबोल करत भूमिगत पार्किंग बंद पाडले.
आंबेडकर अनुयायांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीने भूमिगत पार्किंग रद्द केल्याचे तात्काळ जाहीर केले. आंदोलकांना लेखी पत्रही देण्यात आले असून यासंदर्भात एनएमआरडीए या नोडल एजन्सीलाही पत्र देण्यात आले आहे.
Nagpur दीक्षाभूमीवर सुशोभीकरण आणि नूतनीकरणाचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी शासनाने 214 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे.
या पहिल्या टप्प्यात दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगचा समावेश आहे; मात्र या भूमिगत पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला होता. भूमिगत पार्किंगमुळे भविष्यात अनेक धोके निर्माण होतील, हे नाकारता येणार नाही. भविष्यात स्मारक आणि बोधीवृक्षाला धोका होण्याची भीतीही समाजातील लोक व्यक्त करत होते.
यासंदर्भात Deekshabhoomi स्मारक समितीतर्फे दोन बैठका घेऊन समाजातील लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, भूमिगत पार्किंग रद्द करण्याबाबत अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याचे आश्वासनही देण्यात आले होते; पण भूमिगत पार्किंग नको का? ती रद्द करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी भूमिका आंबेडकरी समाजाची होती.
यासंदर्भात सोमवारी पुन्हा बैठक झाली. त्यानुसार सोमवारी सकाळपासूनच विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि आंबेडकरी अनुयायांसह राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी Deekshabhoomi वर दाखल झाले.
सकाळी १० वाजल्यापासून कामगार येण्यास सुरुवात झाली. राज्यभरातून हजारो अनुयायी दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी भूमिगत पार्किंगच्या कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले. तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सामंजस्याची भूमिका बजावत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. पार्किंगबाबत समिती जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेत दीक्षाभूमीवर हजारो अनुयायी जमले. आंबेडकर अनुयायांची आक्रमकता लक्षात घेऊन, Nagpur दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगचे काम आजपासून रद्द करण्यात येत असल्याचे Deekshabhoomi स्मारक समितीने जाहीर केले; मात्र आंदोलकांनी याबदल लेखी आश्वासन मागितले.
यानंतर Deekshabhoomi स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, माजी सचिव डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डी.जी. दाभाडे यांनी यासंदर्भात आंदोलकांना लेखी आश्वासन पत्र दिले व ते पत्र सर्व आंदोलकांसमोर जाहीर वाचून दाखवण्यात आले. यानंतर आंदोलक शांत झाले.
अधिक वाचा :- Monsoon Update :- विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज, या जीह्यामध्ये रेड अलर्ट
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments