रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
01-07-2024
Nagpur News : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निवळले असले तरी महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. आज दि. १ कोकणामध्ये आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे monsoon.
विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी दि. ३० सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणाच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली येथे सर्वात जास्त ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातही हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. अरबी समुद्रामध्ये ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे.
ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.२ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
गुजरातच्या किनाऱ्यापासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या किनाऱ्यालगत पुन्हा ढग जमा होऊ लागले आहेत.
आज दि. १ कोकणा मधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
तर पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सून लवकरच देश व्यापणार
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (monsoon ) रविवारी दि. ३० उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मूच्या उर्वरित भागासह राजस्थान आणि पंजाबच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे.
दोन दिवसामध्ये राजस्थान, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या आणखी भागात monsoon दाखल होण्यास पोषक हवामान आहे. monsoon मोसमी वारे लवकरच देश व्यापणार असून, देशभरात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
Chandrapur, गडचिरोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया.
अधिक वाचा :- Today Horoscope :- १ जुलै २०२४ : आजचा दिवस शुभ आहे, कामात यश मिळेल.
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments