RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
30-12-2023
पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु अचूक वर्तुळाकार मार्गाने फिरत नाही तर लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत असते. कधी सूर्यापासून लांब अंतरावर असते, तर कधी सूर्यापासून जवळ च्या अंतरावर असते. साधारणपणे ३ जानेवारी दरम्यान पृथ्वी ही सूर्यापासून सर्वांत कमी अंतरावर असते. हे अंतर १४.७१ कोटी कि.मी. राहते अशी माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली.
नेहमी हे अंतर सरासरी १५ कोटी किमी दरम्यान असते. या दिवशी पृथ्वी जुलै महिन्याच्या तुलनेत ५० लाख कि.मी.ने सूर्याच्या जवळ राहणार आहे. पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर कमी असण्याच्या घटनेला ‘उपसूर्य’ असे म्हटले जाते . सूर्य हा तप्त वाळूचा गोळा असून यामध्ये हायड्रोजन पासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू राहते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळतो व त्यापासून ६५ कोटी २५ लाख हेलियम तयार होते.
हा शोध इ. सन १९३९ मध्ये hans bethe या वैज्ञानिकाने लावला. सूर्यावर च्या भागावर तापमान कमी होते, त्याच भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागाचा शोध इ. सन १९८३ मध्ये श्वाबे नावाच्या वैज्ञानिकांनी लावलेला आहे. या डागाचे आता पर्यंत २३ चक्र पूर्ण झाले. २००८ साली फेब्रुवारी महन्या पासून २४ वे चक्र सुरू झाले आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही प्रकारचा परिणाम होणार नाही ही महिती मराठी विज्ञान परिषदे चे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिलेली आहे.
सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे
सूर्याला आकाशगंगेच्या मध्याभोवती एक चक्कर मारण्यास २२५ दशलक्ष वर्षे लागतात. सूर्य हा आकाशगंगे च्या मध्याभोवती २५० किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. आजपर्यंत सूर्याचे २० चक्कर पूर्ण झाले. सूर्याचे वय निश्चित पने करणारे पहिले वैज्ञानिक sir Arthur Eddington आहेत. सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षे आहेत, त्यापैकी पाच अब्ज वर्षे संपले आहेत. म्हणजेच अजून पाच अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू हा श्वेत व बटू ताऱ्यात होईल.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments