बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
20-12-2023
चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर CDCC च्या संदर्भात मिळालेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी ला गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचे टेस्ट ऑडिट सुद्धा केलं जाईल. त्याचा निर्णय साधारणतः १ महिन्याच्या आतमध्ये घेण्यात येईल आणि तो निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री Dilip Valse Patil यांनी दिले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ सभागृहात आमदार Pratibha dhanorkar यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सहकार मंत्री बोलत होते.
आमदार Pratibha dhanorkar म्हणाल्या, जिल्हा बँक म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत मदत करणारी, कर्ज देणारी आणि अडी अडचणीच्या वेळात सांभाळून घेणारी बँक आहे. मात्र, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चे चित्र काही वेगळेच आहे. सदर बँकेला १११ वर्षाचा इतिहास आहे. आजपर्यंत बँकेच्या नियमित निवडणुका होत होत्या. परंतु २०१२ नंतर २०१२ रोजी शासनाने निवडणूक घेणे अपेक्षित असताना, देखील आज २०२३ पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत. याचा फायदा घेऊन २०१७ ते २०२३ या सहा वर्षाच्या काळातील बँकेतील काही संचालकांनी जो गैरवव्यवहाराचा गोंधळ घातला आहे. २०२३ ला जी नोकर भरती झाली त्यात सुधा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. बँकेच्या ६ संचालकावर आणि ५ कर्मचाऱ्या विरूद्ध गुन्हे देखील दाखल केले आहे आणि सदर बँकेची प्रतिमा या प्रकरणामुळे माती मोळ झाली.
२०२० मध्ये देखील बँके मध्ये भर्ती चे गैरप्रकार घडले, बँके मधील काही कर्मचाऱ्यांनी आरोग्याचे खोटे कारण दाखवून आपल्या मुला-मुलीना अनुकंपतत्वावर नोकरी दिली. तसेच खरेदी घोळ झाल्याने २ संचालकांना म्हणजे एकूण ७ संचालकावर गुन्हे दाखल झाले. या बँकेत गैरव्यवहार झाल्याचे महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार विभागाला देखील माहित आहे. ३.९८ कोटीची वसुली करता संचालकांना सहकार कायद्यांनुसर नोटीस देखील बजावल्या गेल्या.
बँकेतील सीईओ कल्याणकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल असताना संचालक मंडळाने परस्पर ठराव घेऊन अजूनही बँकेचा पदभार त्यांच्याकडे आहे. रिझर्व बँक व नाबार्ड यांच्या नियमानुसार गुन्हे दाखल असणाऱ्यांना नेमणूक दाखल करता येत नाही. परंतु रिझर्व बँक व नाबार्ड यांनी दिलेल्या फॉर्मेटमध्ये सीओवर असणाऱ्या २ गुन्ह्याची माहिती ही सदर बँकेच्या संचालक मंडळांनी लपवली आणि रिझर्व बँक व नाबार्डची यांनी देखील फसवणूक केली. या गैरव्यवहारा बदल देखील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही.
आमदार Pratibha dhanorkar यांनी आपल्या लक्षवेधी नोटमध्ये या बँकेत गेल्या ६ वर्षांत झालेल्या गैरव्यवहारांचा उल्लेख केला आहे. त्यात नोकर भरतीचा भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, सीईओवर गुन्हे दाखल असतानाही त्यांची नेमणूक, बँकेचा एनपीए वाढणे, बँकेच्या किरायाच्या जागेवर शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे खर्च करणे, संगणक खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करणे, शेतकरी भवनसाठी जास्त वेळ घेणे, शेतकऱ्यांच्या सहकार संस्थांना मतदानाचा अधिकार न देने , शेतकरी कल्याण निधीचा वापर सर्रास करणे, यासारख्या बाबींचा समावेश आहे.
सहकार मंत्री Dilip Valse Patil म्हणाले, “या बँकेच्या संदर्भात हायकोर्टाने दिलेला स्टे उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळ नेमणूक केली जाईल. त्यावेळी या सर्व बाबींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.”असे मंत्री म्हणाले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी Dilip Valse Patil यांना या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments