RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
19-03-2024
बदललेली जीवनशैली, खानपान, मद्यप्राशन, धूम्रपान यांसोबतच संसर्गजन्य आजार, तीव्र मधुमेह, रक्तातील कावीळ, आदी कारणांमुळे मूत्रपिंड (kidney) आणि यकृत (liver) च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
'सृदृढ आरोग्य ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली' असे संबोधले जाते. मात्र तरीही अनेकजण शरीराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. आजकालचे तरुण तर मोठ्या प्रमाणात मद्यपान, धूम्रपान करतात.
एका दिवशी बहुतांश तरुण दोन ते सिगारेटपेक्षा अधिक सिगारेट्स ओढत असतात. त्यामुळे त्यांच्या किडनी व लिव्हरवर परिणाम होत असते. यासोबतच क्षारयुक्त पाणी प्याल्यानेसुद्धा किडनी व लिव्हरचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेने खूप गरजेचं आहे.
किडनी, लिव्हरचे रुग्ण वाढले
तरुणांमध्ये वाढलेली मद्यपान व व्यसनाधीनता, क्षारयुक्त पाण्याचे प्राशन, आदी कारणामुळे किडनी, लिव्हरचे रुग्ण वाढले आहे.
कारणे काय?
1.व्यसनाधीनता : यकृत आणि मूत्रपिंड खराब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अतिमद्यपान हे आहे. मद्यपानामुळे यकृत आणि मूत्रपिंड लवकर खराब होते.
2. संसर्गजन्य आजार : जन्मत: कमी रक्तपुरवठा किंवा रक्तातील कावीळ, दूषित पाणी याचाही परिणाम यकृत किंवा मूत्रपिंडावर होतो.
3. दूषित पाणी : दूषित पाणी व क्षारयुक्त पाणी किडनीच्या आजारासाठी कारणीभूत ठरत असते. त्यामुळे नेहमी शुद्ध व उकळून पाणी प्यावे.
काय काळजी घ्याल ?
संतुलित आहार, भरपूर पाणी, नियमित व्यायाम, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, मद्यपान टाळणे हे यकृत आणि मूत्रपिडासाठी महत्त्वाचे आहे. तसेच नियमित तपासणी करणे, धूम्रपान आणि हानिकारक पदार्थ टाळणे, हे निरोगी यकृत आणि मूत्रपिंडासाठी आवश्यक आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments