ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
22-01-2024
सात गावाचं पाणी बंद, विज बिल थकलं, महिला सरपंचाची त्यागाची भूमिका
गोंडपिपरी: विद्युत देयकाची भरणा केली नसल्याने सात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सात गावातील हजारो नागरिकांवर जल संकट कोसळलं. पाण्यासाठी दाही दिशा नागरिक भटकत होते. या कठीण परिस्थितीत सरपंच दापत्य गावाच्या मदतीला धावून आलेत. स्वतःच्या शेतीचा बळी दिला आणि गावाची तहान भागविली. सरपंच सौ अपर्णा अशोक रेचनकर व ग्रा. प. सदस्य अशोक रेचनकार असे दांपत्याचे नावे आहेत.
गोंडपिपरी उपविभागातील पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. वीज बिलाचे सहा लाख 13 हजार 807 रुपयांचे देयक न भरल्याने महावितरण कंपनीने ही कारवाई केली आहे. या पाचही योजनेतून तालुक्यातील 30 गावांचा पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे एन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या गावातील नागरिकांवर ओढवली आहे. च्या पाच योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला त्यात चेकबापूर, , हेटीनांदगावं, सकमूर, चेकनांदगावं, कुडेनांदगावं, टोलेनांदगावं, गुजरी या गावांचा समावेश आहे. या सात गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाही पाणीपुरवठा बंद असल्याने सात गावातील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढवली या बिकट स्थितीत सरपंच सौ अपर्णा रेचनकर व ग्रा.प. सदस्य अशोक रेचनकर यांनी सात गावाची तहान भागवण्यासाठी धावून आलेत. वर्धा नदीच्या पात्रात योजनेची विहीर आहे तिथून पाणीपुरवठा केला जातो. आणि तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या काही अंतरावर रेचन कर यांच्या मालकीची दहा एकर शेती आहे शेतात मिरची, वांगे,टमाटर असे पीक उभे आहेत. रोज शेतीला पाणी करावे लागते. मात्र गावाची तहान भागवण्यासाठी रेचनकर दापत्य यांनी शेतीच्या सिंचनासाठी असलेला विद्युत पुरवठा योजनेचा मोटार पंपाकडे वळता केला. यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद झाला आहे परिणामी शेतीला मोठा फटका बसला असून शेत कोरडे पडले आहे. पीक करपत असून गावासाठी शेतीचा बळी देणाऱ्या रेचनकर दांपत्य त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments