समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
21-01-2024
Orange Orchard Management :
शेतकरी नियोजन
पीक : संत्रा
शेतकरी नाव : नीलेश विश्वासराव बनसोड
गाव : कांडली, ता. अचलपूर, जि. अमरावती
शेती : १३ एकर
संत्रा लागवड : ११ एकर
कांडली, (ता. अचलपूर, जि. अमरावती) शिवारात निलेश बनसोड यांची १३ एकरापैकी ११ एकरांत संत्रा बाग आहे. उर्वरित शेतीमध्ये कोरडवाहू पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. खरीप हंगामात ज्वारीची लागवड केली होती. सध्या या शिवारात गव्हाची लागवड केली आहे.
अकरा एकरांतील संत्रा बागेत सुमारे १८५० झाडे आहेत. त्यातील सहा एकरांतील झाडे १५ वर्षे वयाची, तर उर्वरित पाच एकरांतील झाडे साडेतीन वर्षे वयाची आहेत. जुनी संत्रा लागवड ही १८ बाय १८ फूट अंतरावर आहे. तर नवीन लागवडीपैकी काही झाडे २० बाय १० फूट, तर काही १५ बाय १५ फूट अंतरावर लागवड केली आहेत.
मागील दोन वर्षांपासून संत्रा बागेत कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर दिला जातो. पुढील वर्षी नवीन लागवडीला साडेचार वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. त्या वेळी या बागेतून उत्पादन घेण्यास सुरुवात केली जाईल. झाडे अपेक्षित वयाची झाल्यावर नवतीचे (नवीन पालवी) प्रमाण अपेक्षेप्रमाणे मिळते, असा त्यांचा अनुभव आहे.
कोरोना व त्यानंतरच्या काळात संत्रा फळांना अपेक्षित उठाव नव्हता. बाजारपेठा गडगडल्याने फळांना अपेक्षित दर मिळत नव्हता. परिणामी संत्रा बाग व्यवस्थापनावर अधिकचा खर्च करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे गेली तीन वर्षे छाटणी कामे करून त्यावर खर्च करणे शक्य नव्हते. कांडली भागात छाटणीसाठी यंत्राची उपलब्धता नसल्यामुळे छाटणी कामांसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते.
मागील काही वर्षांत मजुरी दरांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चावर अतिरिक्त ताण पडत होता. परिणामी, उत्पादन खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने मागील तीन वर्षे बागेत छाटणीची कामे झाली नाहीत. या वर्षी मात्र सल काढणे आवश्यक होते. त्यासाठी मजूर लावून झाडाची सल काढणीची कामे करून घेतली.
मृग बहरातील कामे
मृग बहराच्या नियोजनानुसार मे महिन्यामध्ये बाग ताणावर सोडली होती. हा ताण पावसाच्या पाण्यावर तोडण्याचे नियोजन असते. या वर्षी पाऊस लांबल्यामुळे जुलै महिन्याच्या पावसामध्ये बागेचा ताण तुटला.
तत्पूर्वी बागेस निंबोळी पावडर १ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे मात्रा देण्यात आल्या.
नवती फुटण्यास सुरुवात झाल्यावर कीड, रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक फवारणीचे नियोजन केले. या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. त्यासाठी आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्यावर करण्यावर भर दिला जातो.
यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होते. त्यामुळे आवश्यकतेनुसार मोकळे पाणी आणि ठिबकद्वारे सिंचन करण्यात आले.
सप्टेंबर महिन्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी आणि आवश्यकतेनुसार रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या.
ऑक्टोबर महिन्यात बागेत उगवलेले गवत ग्रासकटरने काढून घेतले. त्यानंतर सेंद्रिय खतांच्या मात्रा वरीलप्रमाणे देण्यात आल्या.
आगामी व्यवस्थापन
सध्या बागेतील सुमारे ३५० झाडांवर मृग बहर धरलेला आहे. झाडांवर सध्या ९१ आणि ७१ या आकाराची फळे लगडलेली आहेत.
साधारण फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फळे तोडणीस येतील. वातावरणाची स्थिती लक्षात घेऊन व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल केला जाईल.
फळांचा दर्जा राखण्यासाठी सिलीकॉनयुक्त खताचा वापर करणार आहे.
नियोजनानुसार निंबोळी पावडर आणि त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातील. त्यानंतर झाडांजवळ काढलेल्या सऱ्यांमधून मोकळे पाणी दिले जाईल.
आवश्यकतेनुसार कीड-रोगांचा प्रादुर्भाव पाहून रासायनिक फवारणीचे नियोजन आहे.
सुमारे ३५० झाडांवर मृग बहार धरलेला आहे. त्या माध्यमातून साधारण ३० टन संत्रा उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. विक्री नियोजनामध्ये संपूर्ण बाग व्यापाऱ्यांना दिली जाते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
बागेत मागील दोन वर्षांपासून सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य राखण्यासह झाडांवर देखील चांगले परिणाम दिसून येत असल्याचा अनुभव आहे.
बागेत बहर धरण्याच्या नियोजनानुसार निंबोळी पावडर, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापर केला जातो.
- नीलेश बनसोड, ९८६०६१९३७२ (शब्दांकन : विनोद इंगोले )
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments