बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
08-02-2025
गडचिरोली – भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन केल्याने गडचिरोली शहरात उत्साहाचे वातावरण होते. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने इंदिरा गांधी चौकात भाजपच्या वतीने भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून, मिठाई वाटून आणि गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी "भारतीय जनता पक्ष जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या जल्लोषात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, ज्येष्ठ नेते सुधाकरजी येनंदलवार, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ.नितिनजी कोडवते,डाँ.चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, तसेच विवेक बैस, विनोद देवोजवार, अनिल करपे,विशाल हरडे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, पल्लवी बारापात्रे, अविनाश विश्रोजवार, अर्चना चन्नावार,सिमा कन्नमवार, भुपेश कुळमेथे, मंगेश रणदीवे, गुंडु सरदार, हरीश माकडे, दीपक सातपुते,बारसागडे ताई,आखाडे आणि अन्य कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. या सोहळ्यामुळे संपूर्ण गडचिरोली शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments