STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
16-03-2024
Health Tips : मासिक पाळीतील ते पाच दिवस स्त्रियांच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या दिवसांत शरीरात वेगळे बदल घडून येतात. अस्वस्थ वाटणे, अंग दुखणे, थकवा यासारख्या अनेक समस्या जाणवतात. यासोबतच अनेक हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळे या दिवसामध्ये महिलांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मासिक पाळीदरम्यान शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज असते. बहुतेक महिलांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, मळमळ होणे, पायात गोळा येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
या काळामध्ये निष्काळजीपणा किंवा आरोग्याची देखभाल न केल्यास भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेसह महिलांनी आरोग्याची पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.
आराम आवश्यक
या काळात महिलांना पुरेसा आराम आवश्यक असतो.
किमान सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. दगदग टाळावी. हिमोग्लोबिन कमी होण्याचा धोका असते. यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे.
काय करू नये ?
1. या काळात फास्ट फूड, तेलकट, अधिक मसालेदार पदार्थ टाळले पाहिजेत. नियमित व्यायाम करावा.
2. जास्त प्रमाणात व्यायाम करु नये. रिकाम्या पोटी व्यायाम करू नये. सैल कपडे घालावे.
मासिक पाळीत हलका व्यायाम महत्त्वाचा
मासिक पाळीत हलका व्यायाम महत्त्वाचा आहे. हलका व्यायाम केल्याने दुखण्यापासून नक्कीच आराम मिळेल, पण जास्त व्यायाममुळे शरीरात क्रॅम्प्स, स्नायू दुखणे, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. मासिक पाळीदरम्यान जास्त व्यायाम केल्याने कंबर आणि खालच्या ओटीपोटात वेदना वाढू शकतात.
आहारही तेवढाच महत्त्वाच
लोह, फायबर, प्रोटीनयुक्त आहार आवश्यक आहे. यासोबतच डाळी, कडधान्य, हिरव्या भाज्या, पेंडखजूर, गूळ, शेंगदाणाना, लाडू, पालक, मोसंबी, संत्रा, लिंबूचा आहारात वापर करावा. सकस आणि पुरेसा आहार आवश्यक आहे. या काळात महिलांच्या शरीरातील रक्त कमी होते. ज्यांना जास्त रक्तस्त्राव होतो, त्यांच्या शरीरात अनेकवेळा रक्ताची कमतरता असते. ही समस्या टाळण्यासाठी बीट, पालक, केळी आदी लोहयुक्त पदार्थ सेवन करावे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments