STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
15-03-2024
पूर्ण विकसित नसलेल्या बाळाला NICU मध्ये ठेऊन त्याची काळजी घेतली जाते. अशी वेळ येऊ नये यासाठी गर्भधारणा काळात पूर्ण खबरदारी घेणे आवश्यक आहे,असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
अकाली जन्मलेले बाळ शारीरिक आणि विकासात्मकदृष्ट्या विकसित नसते. बाहेरील वातावरणात, तसेच पूर्ण मुदतीच्या बाळांमध्ये संक्रमण करण्यास सक्षम नसतात. अशा बाळांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने ते विविध आजाराशी लढू शकत नाही, परिणामी कमी मुदतीच्या व कमी विकसित बाळांना NICU मध्ये ठेवून औषधोपचार करणे आवश्यक ठरते.
रुग्णालयात तान्हुल्यांवर काचेच्या पेटीत उपचार
जिल्हा महिला व बालरुग्णालयात कमी वजनाचे व पूर्ण विकास न झालेल्या बाळांना काचेच्या पेटीत ठेवून उपचार केला जातो. गर्भवती मातांनी गर्भारपणामध्ये औषधी, पोषण आहाराकडे लक्ष द्यावे, रक्तचाचण्या, सोनोग्राफी, तसेच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
1. अपूर्वकालीन प्रसूती Preterm Labor :
गर्भवती महिलांनी गर्भधारणेचा कार्यकाळ पूर्ण केला पाहिजे. मात्र, कालावधी पूर्ण होण्याआधीच प्रसूती होत असते.
2. व्यंग असणारे बाळ Sarcastic Child :
गर्भातील बाळांमध्ये विविध प्रकारचे शारीरिक व्यंग असलेल्या बाळांना NICU मध्ये ठेवून त्याच्यावर औषधोपचार केला जातो.
3. कमी वजनाचे बाळ Underweight Baby :
अडीच किलोपेक्षा अधिक वजन असलेले बाळ पूर्ण विकसित व सुदृढ असते. कमी वजनाचे बाळ काचेत ठेवले जाते.
4. गंभीर आजाराचे बाळ Child With Severe Azalea :
न्यूमोनिया, कावीळ व तत्सम गंभीर आजार असलेल्या बाळाला काचेत ठेवले जाते. त्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार केला जातो.
1. गर्भधारणेपूर्वी Pre-Pregnancy :
वेळोवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने चाचण्या व औषधोपचार करावा. सोनोग्रॉफी करावी. पोषण आहाराकडे लक्ष द्यावे. शारीरिक हालचाली करणे गरजेचे आहे.
2. गर्भधारणेनंतर Post Pregnancy :
बाळ व मातेच्या पोषण आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छता बाळगावी, प्रकृतीत काही फरक वाटल्यास तातडीने तज्ज्ञांना दाखविणे गरजेचे आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments