निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
07-01-2024
GADCHIROLI : रस्त्याच्या कामासाठी बेकायदेशीर उत्खनन करून वापरलेल्या मुरुमाचे ट्रॅक्टर सोडून दंड रक्कम कमी करण्यासाठी पाच लाखांची लाच घेणाऱ्या पेरमिलीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याची रवानगी ६ डिसेंबरला कारागृहात झाली. ४ जानेवारीला त्यास एसबीने जेरबंद केले होते.
तुमरगुंडा कासमपल्ली रस्त्याच्या कामासाठी बेकायदेशीर मुरुमाचा वापर केला जात होता. वनविभागाने ट्रॅक्टर व मुरुमाचा साठा जप्त केला. यानंतर संबंधित tractor मालकास 72 लाख रुपयांचा दंड केला.
दंडाची रक्कम 72 लाखांवरून पाच लाखांपर्यंत कमी करून ट्रॅक्टर सोडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी Pramod Jenekar याने 10 लाख रुपयांची मागणी केली,तडजोडीनंतर 5 लाख स्वीकारण्याचे ठरले. 4 जानेवारील त्यास पेरमिली येथे शासकीय निवासस्थानी सापळा लावून रंगेहाथ पकडले. त्यास 5 जानेवारी रोजी (Aheri Court) अहेरी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.
6 जानेवारी रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी झाली, अशी माहिती उपअधीक्षक Anamika Mirzapure यांनी दिली. अधिक तपास पो.नि. Shridhar Bhosale करत आहेत.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments