ProfileImage
5

Post

0

Followers

1

Following

PostImage

RJ content studio

July 15, 2024

PostImage

भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती


*भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती*

 

 

 मित्रांनो भारतीय डाक विभागात मध्ये 44228 जागा साठी भरती निघाली आहे. 

आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सुवर्ण संधी म्हणावी लागेल. ज्यांना 10 वी मध्ये जास्त टक्केवारी आहे त्यांनी नक्की अर्ज करा.या पद साठी काय शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची तारीख पुढील प्रमाणे...

 

शैक्षणिक पात्रता

 

(i) 10वी उत्तीर्ण असावा 

ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक 

 

 वयाची अट -

 :- 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण :

- संपूर्ण भारत

 

 परीक्षेची फी 

:- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

 

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 

-05 ऑगस्ट 2024 

 

अर्ज करण्या साठी लिंक 

-

https://indiapostgdsonline.gov.in/


PostImage

RJ content studio

July 13, 2024

PostImage

"अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अडकले लग्न बंधनात "


"अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अडकले लग्न बंधनात "
 
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स  इंडस्ट्रीजचे चेअरमन  मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट  यांचा विवाह 
12 जुलै  2024  पार पडला. यांच्या लग्नासाठी

जगातील अनेक स्टार्स,    उद्योगपती,क्रिकेटर्सनी हजेरी लावली. अनेक वर्ष  हा विवाह लोकांच्या स्मरणात राहील असा हा विवाह पार पडला .

मुंबईच्या  जिओ  वर्ल्ड सेंटर मध्ये हा विवाह संपन्न झाला.
 लग्नाचा आनंद  सर्व  अंबानी  परिवारांच्या चेहऱ्यावर झळकत  होता.

 मोठ मोठया स्टार्सनी  लग्नामध्ये डान्स करून  सर्वांचे मनोरंजन केले .

अशा प्रकारे  काल रात्री या नववरवधू नी सप्तपदी घेऊन  विवाह संपन्न केला.


PostImage

RJ content studio

July 12, 2024

PostImage

सरकारी शाळा आणि आपल्या हक्काची लालपरी ही जगली पाहिजे.


"ये जिओ भी हमे जीने नही देंगा " अशी म्हणण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. अगोदर माणसाचे जीवन हे  "अन्न,वस्त्र, निवारा " यावर निर्भर होते. मात्र आता इंटरनेटची सुविधा आल्यापासून  माणसाला इंटरनेट सुद्धा  अत्यावश्यक झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 
 जिओ ने आपल्या रिचार्जचे दर हे 
12% ते 25% पर्यंत वाढवले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ पोहचणार आहे. जिओने सर्वात आधी कमी पैशात  लोकांना डाटा  फ्री मध्ये दिला व आपला विस्तार वाढवला आणी आता 80% लोकांन कडे जिओचे सिम असल्याचे आपल्याला दिसतील. जिओ चे दर महाग झाले म्हूणन लोक आता परत सरकारी बीएसएनएल (BSNL) कंपनी कडे वळताना दिसत आहे. 
      आता अशीच काही परिस्थिती "जिल्हा परिषद सरकारी शाळा" आणी आपल्या हक्काची "लालपरी" एस टी महामंडळ ची होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  मुलांचे शाळांमधील घटते  प्रमाण आणि प्रायव्हेट  शाळांची  वाढती मागणी यामुळे भविष्यात सरकारी शाळा बंद पडतील की कांय ? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडतील .आता नर्सरीच्या मुलांची   फी एवढी  वाढली आहे की त्यांच्या  पालकांना सुद्धा  12 वी पर्यतच्या शिक्षणासाठी  एवढे पैसे  लागले नसतील .आणि खाजगी शाळेत जाऊन  ट्युशन साठी मात्र बाहेरच जावे लागते. 
एस टी महामंडळची  परिस्थिती तर आपल्या माहीतच आहे. सरकारने  सवलती तर खूप साऱ्या  दिल्या आहे. पण बस मात्र कमी पडताना आपल्याला दिसतात. सरकारने  प्रवासांची  वाढती संख्या बघून  बसची ही संख्या वाढवली पाहिजे.  एसटी  महामंडळ चे शासनात विलीनीकरण  व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी खूप मोठे आंदोलन केले पण ते आद्यापही  होऊ शकले नाही. कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न  सुटता सुटे ना, अजून पण या कर्मचाऱ्यांना  सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. महाराष्ट्रात इतरही महामंडळ आहे  ज्यांना सातवा वेतन लागू आहे फक्त्त एस टी महामंडळ  वगळता, तसेच यांचे  पगार पूर्वी 7 तारखेलाच व्हायचे  आता मात्र  पगाराच्या  तारीखेची नियोजित वेळे राहलेली नाही. त्यांना पहिलाच पगार कमी आणि तो पण वेळेवर न मिळाल्यामुळे  अनेक आर्थिक अडचणींचा सामना  करावा लागतो. अधिवेशनामध्ये याच्या प्रश्नांवर  बोलले  तर जाते पण यांच्या  वेतनाचा प्रश्न सोडवताना मात्र सरकार अपयशी ठरताना  दिसते.  आपण जेव्हा फिरण्यासाठी बाहेरील राज्यात जातो तिथे खाजगी बसची दशा पाहून आपल्याला आपल्या "लालपरी" ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
"सरकारी शाळा" आणि एसटी ही सर्वसामान्य माणसाची आहे. ह्या राहायला पाहिजे याकडे सरकार ने लक्ष देण गरजेचं आहे.


PostImage

RJ content studio

July 9, 2024

PostImage

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & CONSTABLE ( CBIC&CAN) पदाच्या 8326 जागांसाठी भरती


मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS मल्टी टास्किंग स्टाफ, कॉन्स्टेबल ( CBIC&CAN) या दोन पदासाठी केंद्रसरकार भरती घेत आहे. तुम्ही जर 10 वी पास असाल तुम्ही पण हा फॉर्म भरू शकता. याबद्दलची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

      

   *पद*

1)MTS - 4887 

2)CBIC/CBN 3439

                       

                Total =8326

 

 

*शैक्षणिक पात्रता* 

- दहावी पास 

 

 

*वयोमर्यादा*

18 ते 25/27

SC/ST -5 वर्षे सूट 

OBC - 3 वर्ष सूट 

 

 

 *परीक्षा शुल्क*

    -100 रुपये 

   - SC/ST/EXSM/महिलांना परीक्षा शुल्क नाही.

 

 

*फॉर्म भरण्याची शेवटची तारीख*

- - 31 जुलै 2024 

 

 मित्रांनो या पोस्टसाठी दोन पेपर होणार असून कॉन्स्टेबल पदा साठी मैदानी चाचणी होणार आहे. तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा कारण शेवटी लिंक न राहाल्यामुळे आपणास फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ शकते. मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना / मुलींना यांचा फायदा होईल.


PostImage

RJ content studio

July 8, 2024

PostImage

"लाडकी बहीण योजना " पण लाडक्या भाऊ /दाजीं चं कांय सोशल मीडियावर ट्रेंडिंग वर


मित्रांनो काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी "माझी लाडकी बहीण योजना " महायुती सरकारतर्फे सादर केली. आणि या योजनेचे महाराष्ट्र मध्ये तुफान आलय असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक महिला मी या योजनेसाठी पात्र आहे की नाही याचा शोध घेऊ लागल्या आहेत . या योजने अंतर्गत कमी उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केल्यापासून राज्यभर सरकारी कार्यालयात गर्दीच गर्दी पाहायला भेटत आहे.

सोशल मीडियावर पण "लाडकी बहीण योजना " ट्रेंडिंग वर दिसत आहेत. पुरुष मंडळी आपल्या व्हिडिओद्वारे "लाडकी बहीण योजना" ठीक आहे. पण लाडका दाजीचं काय? असा प्रश्न निर्माण करत आहे. त्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब अशा अनेक सोशल मीडियावर आपल्याला हसवणारे व्हिडिओ दिसत आहे.

 आणि लोकांचें पण खूप मनोरंजन होताना दिसत आहे.

 आपल्याला या योजनेबद्दल काय वाटते आपण ते कमेंट मध्ये नक्की लिहावे. अशाच काही कॉमेडी व्हिडिओंची लिंक खाली देत आहे आपल्याला ते नक्की आवडेल

1)

https://youtu.be/Nm8Rf8jvBXk?si=fRa0c8vqQaab4सेक्सड

 

2)https://youtube.com/shorts/VRWScMU3jgE?si=GYDwU5nrbh9_फज्क

 

3)https://youtube.com/shorts/yF7Yk2nglXc?si=Mk7O7QaQOB5UEIK0

 

4)https://www.instagram.com/reel/C9CowUKtKnL/?igsh=MTN5dWZ5d3B2Z2F2cw==