समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
04-01-2024
कुनघाडा ( रै .) ३ जानेवारी २०२४
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्र्वशांती विद्यालय, कुनघाडा येथे आज बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ ला सावित्रीबाई फुले जयंती सोहळा तथा महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अगोदर पासूनच जय्यत तयारी करण्यात आली होती. माता पालकांना सन्मानपूर्वक निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेली होती. आग्रहास्तव विनंतीला मान देऊन खुप मोठ्या प्रमाणावर माता पालक भगिनी शाळेत उपस्थित झाल्या.
विद्यालयात त्यांना सन्मानपूर्वक बसविण्यात आले. चहापान देऊन " अतिथी देवो भव " ही परंपरा पाळण्यात आली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेले चित्र रेखाटन त्यांना दाखविण्यात आले. कार्यक्रमातील एक आगळा वेगळा भाग म्हणून माता पालकांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यामधे वीणाताई अशोक दुधे प्रथम आल्या. द्वितीय क्रमांकावर मंजुषाताई अशोक वाघाडे तर तृतीय क्रमांकावर उषाताई दिपक भांडेकर समाधानी झाल्या.यानंतर सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम घेण्यात आला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यातील पहिल्या सत्रात गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ. अल्काताई धोडरे मॅडम यांची मुलाखत सहाव्या वर्गातील चिमुकली कु. धनश्री गव्हारे हिने घेतली. आपल्या चौकस प्रश्नांनी तिने सरपंच मॅडमला बरंच बोलतं केलं. तिच्या वाकचातूर्याने माता पालक श्रोते अगदी मंत्रमुग्ध झाले.
त्यानंतर माता पालक भगिनींची गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यामधे नम्रताताई गेडाम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर जयश्रीताई कुनघाडकर यांनी दुसरा व कविताताई दुर्गे यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री बाळबुद्धे सर, श्री कन्नाके सर व श्री धानोरकर सर यांनी मान पटकाविला.
शेवटी सर्वधर्मीय प्रार्थना घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाची अध्यक्षता सौ. वनिता वैरागडे मॅडम यांनी भूषविली. विशेष अतिथी म्हणून आदिवासी साहित्यिक व कवयित्री कुसुमताई अलाम ( गडचिरोली), सौ. अर्चनाताई मेश्राम (सरपंच - भाडभिडी), सपनाताई शेडमाके (सरपंच - मुरमुरी) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे छायांकन सागर उरकुडे सर व निलेश आसुटकर सर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माता पालक संघाचे सर्व सदस्य, शालेय उप - मुख्यमंत्री कु. गायत्री कुनघाडकर व सर्व मंत्रिमंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जि. एम.कुनघाडकर सर, पर्यवेक्षक श्री भांडेकर सर आणि विद्यालयातील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी यामधे सिंहाचा वाटा उचलला.
कार्यक्रमाचे फलित पाहून मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले व संपूर्ण यशस्वी घटकांचे आभार मानले.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments