संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
15-11-2024
• नंदूरबार, . संविधानात बुद्ध, गांधींजी, आंबेडकरांचे विचार यांचे विचार आहे. त्याला कोरं म्हणणे म्हणजे या सर्वांचा अपमान आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आरएसएस आणि भाजपला संविधान मान्य नाही तर संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई सुरू आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, देशातील जमीन, पाणी जगंलावर पहिला अधिकार हा आदिवासींचा आहे. ते देशाचे पहिले मालक आहेत. त्यांना केवळ आदिवासी आहे म्हणून मागे ठेवले जाते. नोकऱ्या दिल्या जात नाही. वनवासी म्हणून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले जातात. पण संविधानात असा काही शब्दच नाही. नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे चारही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उमेदवारी देण्यात आली आहे. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात माझ्या हातातील संविधान कोरं आहे. तुम्ही या संविधानाला कोरं म्हणून गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतात. संविधानात तुम्हाला कुठेही वनवासी म्हटले जात नाही. यात तुम्हाला आदिवासी म्हटले जाते. म्हणजे देशाचे पहिले मालक
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
राहुल गांधी म्हणाले की, वनवासी म्हणजे तुमचा कशावरच अधिकार नाही. जंगल कापून ती जमीन सरकार उद्योगपतींना देण्यात येते. तुमच्या मुलांना नोकरी दिली जात नाही. आदिवासींची संख्या ८ टक्के आहे तर त्यांना ८ भागीदारी मिळावी.
राहुल गांधी म्हणाले की, २५ लाख रुपयांचा विमा काढणार, २५ लाखांपर्यंत उपचार मोफत दिला जाणार. अडीच कोटी रोजगार दिले जाणार. पण जो पर्यंत युवकांना रोजगार दिले जाणार नाहीत, तोपर्यंत त्यांना ४ हजार रुपये महिना देणार आहोत. आम्ही ज्या त्या राज्याचे प्रकल्प त्याच राज्यांना देणार देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे..
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments