निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
15-11-2024
दोन लाखांचे नुकसान : चौकशी करून कारवाईची मागणी
कुरखेडा : कापणी व बांधणीनंतर धान पिकाचे पुंजणे शेतात करून ठेवले; परंतु याच पुंजण्यांवर कुप्रवृत्तीची वक्रदृष्टी पडली. मळणीच्या प्रतीक्षेत असलेले दोन शेतकऱ्यांचे साडेचार एकरातील धान पुंजणे अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून जाळले. ही घटना कुरखेडा तालुक्याच्या मौशी येथे बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.
मौशी येथील शेतकरी तथा पोलिस पाटील टिकाराम सहारे यांची दीड एकर शेती मौशी-कुरखेडा महामार्गाला लागून आहे. याच परिसरात आनंदा माधव बोदेले यांची तीन एकर शेती आहे. टिकाराम सहारे यांच्या शेतात धानाचे दोन पुंजणे होते तर बोदेले यांच्याही शेतात एक धानाचा पुंजणा होता. थ्रेशर मशीन उपलब्ध होताच मळणीचा बेत शेतकऱ्यांचा होता. दरम्यान, बुधवारच्या रात्री ११ वाजता शेतात आगीचे लोळ उठत असल्याचे मौशीवासीयांना दिसले. त्यांनी वेळीच शेताकडे धाव घेतली, तर पुंजणे आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसूनआले. त्यानंतर वेळीच कुरखेडा येथील नगर पंचायतचे अग्निशमन वाहन बोलावण्यात आले.
रात्री १२ वाजेच्या सुमारास अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत पुंजणे जळून खाक झाले होते. दुसऱ्या दिवशी शेतकरीसहारे व बोदेले यांनी कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली. या तक्रारीवरून आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत
घटनास्थळी आढळली पेट्रोलची रिकामी बॉटल
पुंजणे जळालेल्या परिसरात पाहणी केली असता गुरुवारी सकाळी पेट्रोलची रिकामी बॉटल आढळली, त्यामुळे आरोपीने पेट्रोल पंपावरून बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन त्याचा वापर धानाचे पुंजणे जाळण्यासाठी केला असावा, अशी शंका पोलिसांना आहे. पंपावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती बरेच धागेदोरे लागू शकतात.
.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments