ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
12-11-2024
वैरागड : या वर्षात समाधानकारक पाऊस, अपवाद वगळता धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला नसल्याने धान पीक जोमात आहे. कमी मुदतीच्या धानाची कापणी, मळणी पूर्ण झाली आहे. हमीभाव केंद्र सुरू होण्यास वेळ असल्याने व खुल्या बाजारात धानाला चांगला भाव असल्याने धानाची आवक वाढली आहे. यंदा शासनाच्या हमीभाव केंद्रावर धानाची रेकॉर्ड ब्रेक खरेदी होण्याचा अंदाज आहे.
सन २०२३-२४ च्या खरीप हंगामात प्रादेशिक कार्यालय गडचिरोली अंतर्गत नऊ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षात ती पुन्हा लाखात वाढण्याची शक्यता आहे. या वर्षात १२ ते १३ लाख क्विंटल धानाची खरेदी होण्याचा अंदाज आहे. कमी मुदतीच्या धनाची कापणी, मळणी झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी दिवाळीपासूनच खुल्या बाजारात गर्दी केली आहे. बारीक धानाला केवळ २ हजार ४०० व ठोकळ धानाला २ हजार१०० रुपये प्रतिक्विंटल असा सुरुवातीलाच भाव मिळत आहे.
हमीभाव केंद्रावर २ हजार ३१० रुपयेप्रति क्विंटल भाव व हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस असल्याने अनेक शेतकरी आता हमीभाव खरेदी केंद्र सुरूहोण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरूवात केली आहे.
मागील वर्षी नवीन धानाला तीन हजार रूपये भाव मिळाला होता. तेवढाच भाव यावर्षीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता भावासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी. विक्री कमी झाल्यास धानाचे भाव आपोआप वाढतील. तोपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही पूर्ण झाल्या असून, नियोजनाची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने व या कार्यात अधिकारी व्यस्त आहेत. सध्या धान विक्रीसाठी ऑनलाइन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
- एच. एस. सोनवाने, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आरमोरी
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments