संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
12-11-2024
आरमोरीतील काँग्रेसमधील बंडखोर चार उमेदवारांचे अखेर १० नोव्हेंबरला सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. मात्र, या यादीत काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी व काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा नीता तलांडी यांचा समावेश नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. शिलू चिमूरकर, डॉ. सोनल कोवे, भरत येरमे यांचा निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे. गेडाम व डॉ. चिमूरकर हे आरमोरीत इच्छुक होते, पण दोघांनाही डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी पक्षादेश झुगारून अपक्ष नामांकन दाखल केले. गडचिरोलीत डॉ. सोनल कोवे यांनी बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरल्या, तर भरत येरमे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. या सर्वांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तथापि, अहेरीत काँग्रेसने जागा
आपल्या वाट्याला यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले; पण आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे (शरद पवार गट) गेली. यामुळे नाराज झालेले आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार पेंटारामा तलांडी यांच्या कन्या व काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा नीता तलांडी या जनशक्ती पक्षाकडून रणांगणात आहेत. आई सगुणा व वडील पेंटारामा यांनीही लेकीची पाठराखण केली असून, ते प्रचारात उतरले आहेत.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments