अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
03-11-2024
पालकांमध्ये खळबळ; जिल्हानजीकच्या नवेगाव येथे प्रयत्न फसला
गडचिरोली, ब्युरो. सद्यः स्थितीत दिवाळीचा उत्सव सुरू असून सर्वसामान्य नागरिक दीपोत्सवात मग्न आहेत. यात बालगोपालांचाही समावेश आहे. पालक वर्ग दीपोत्सवात व्यस्त असताना बच्चेकंपनी मौजमस्तीत दंग आहेत. अशातच जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 2) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्हास्थळपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे अज्ञात इसमाने 12 वर्षीय बालकास बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्न बालकाच्या धाडसामुळे फसला. मात्र, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मीपूजनानंतर शनिवारी शहरासह ग्रामीण भागात (बलीप्रतिपदा) गायगोधनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान जिल्हास्थळापासून चंद्रपूर मार्गावर 5 किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे तोंडावर रुमाल बांधलेल्या एका अज्ञात इसमाने घरातील अंगणात खेळत असलेल्या 12 वर्षीय बालकास चॉकलेटचे आमिष दाखविले.
बालक घराबाहेर येताच तोंड तसेच हात दाबून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने इज्ञात इसमाच्या हाताला चावा घेत स्वतःची सुटका करून घेत घराकडे धाव घेतली. आपल्यावर घडलेली आपबिती बालकाने कुटुंबीयांना देताच एकच खळबळ निर्माण झाली. गांभीर्य लक्षात घेता पालकाने याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. सद्यःस्थितीत दिवाळी सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहेत. काही अज्ञात व्यक्ती (मुले पळविणारी टोळी) फायदा घेत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. समयसूचकतेमुळे बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला गेला असला तरी या घटनेमुळे जिल्हास्थळ परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने घेत या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
अज्ञाताने घेतली होती विशेष खबरदारी: मुले पळविणाऱ्या टोळीतील अज्ञात इसमाने बालकास पळवितांना विशेषखबरदारी घेतल्याचे एकंदरीत घटनास्थळावरून स्पष्ट होत आहे. अज्ञात इसमाने नवेगाव येथील संबंधित बालकाच्या घरासमोरील गेटवर येऊन बालकास चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर बोलाविले. त्यानंतर त्याचे तोंड व हात दाबून घेत त्याला पळवून नेले. यादरम्यान त्याने तोंडाला रुमाल, डोक्यावर टोपी घातली असल्याचे बालकाने सांगितले.
सीसीटीव्हीमध्ये आढळून आला इसम संबंधित बालकाच्या पालकाने घरासमोरील चंद्रपूर मार्गस्थित काही दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता काळा पेंट, हिरवा शर्ट, डोक्यावर टोपी घातलेला तसेच तोंडाला रुमाल बांधलेला स्थितीत असलेला अज्ञात इसम येताना दिसून आले. मात्र फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट होत नसल्याने इसमाची ओळख पटविणे शक्य होऊ शकले नाही. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरुन चंद्रपूर मार्गावर एक चारचाकी उभी असल्याचे तसेच इसम संबंधितांना इशारा करीत असल्याचेही निर्देशनास आले. यावरुन यात आणखी काही आरोपी असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाचीअसंवेदनशीलता
बालकास पळविण्याचा प्रयत्न फसल्यानंतर संबंधित पालकाने यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गडचिरोली पोलिस ठाणे गाठले असता ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल न करता उलट पालकास संबंधित घटनेचे फुटेज भागविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने घटनास्थळ गाठून विशेष चौकशी करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशीलता पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवरप्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
अज्ञाताने चाकू दाखवून मारण्याची दिली धमकी
संबंधित 12 वर्षीय बालकाने सांगितलेलेल्या आपबितीनुसार तोंडाला रुमाल बांधून असलेल्या अज्ञात इसमाने बालकास चॉकलेट आमिष दाखवून घराबाहेर काढले. बालक घराबाहेर येताच हाताने तोंड दाबून तसेच हात बांधून त्याला नेले. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता इसमाने चाकूचा धाक दाखवित तुझ्यासह तुझ्या आईवडिलांनाही मारून टाकण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments