CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
03-11-2024
नागपूर : वैद्यकीय शिक्षण घेताना युवक वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडला. दोघेही डॉक्टरची पदवी घेऊन बाहर पडताच प्रेमविवाह केला. मात्र, त्याच महाविद्यालयातील अन्य चार तरुणीशीही त्याचे अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले. संसार तुटण्याच्या मार्गावर असतानाच पत्नीने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. समूपदेशनानंतर त्यानेही प्रेमप्रकरणाची कबुली दिली आणि भविष्यात अनैतिक संबंध न ठेवण्याचे पत्नीला वचन दिले. अशाप्रकारे डॉक्टर दाम्पत्याचा संसार पुन्हा फुलला.
सुनील आणि श्वेता (बदललेले नाव) हे दोघेही एकाच वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघेही अभ्यास हुशार होते. शिक्षण घेताना सुनीलने तिच्याशी मैत्री केली. दोघांची मैत्री काही दिवसांत प्रेमसंबंधात बदलली. त्यांनी पदवी पूर्ण झाल्यानंतर प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, दोघांचेही प्रेमप्रकरणाची महाविद्यालयात मोठी चर्चा होती. डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर सुनील आणि श्वेता यांनी कुटुंबियांच्या परवानगीने प्रेमविवाह केला. तो धरमपेठमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागला तर श्वेताने स्वतःचे क्लिनिक उघडले. वर्षभर संसार सुरळीत सुरु होता. त्यांना एक गोंडस बाळ झाले आणि काही दिवसांतच सुनीलचा स्वभाव बदलला. तो उशिरा घरी यायला लागला आणि तो बरेचदा मोबाईलवर कुणाशीतरी बोलत राहायचा. त्यामुळे श्वेताला त्याच्यावर संशय आला. त्याला जुगाराचा नाद लागला आणि कर्जसुद्धा काढले. पगारही तो जुगारात गमवायला लागला. कर्ज मागणाऱ्यांचे धमक्यांचे फोन आणि काही जण थेट घरापर्यंत यायला लागले. त्यामुळे घरात वाद-विवाद सुरु झाले. शेवटी श्वेता घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहचली.
पतीचे चार तरुणींशी प्रेमसंबंध
डॉ. सुनीलचे दोन वर्गमैत्रिणींशी प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती पत्नी डॉ. श्वेता हिला मिळाली. तिने दोन्ही डॉक्टर मैत्रिणींची समजूत घालून संसारात विघ्न न घालण्याची विनंती केली. मात्र, पती मानायला तयार नव्हता. तसेच हॉस्पिटलमधील एक महिला डॉक्टर आणि एका परिचारिकेशीही त्याचे प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आली. त्यापैकी एका डॉक्टर महिलेला तर लग्नाचेही आमिष दाखविल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पत्नीने डोक्यावर हात मारुन घेतला.
समूपदेशनाने संसार फुलला
डॉ. सुनीलविरुद्ध पत्नी डॉ. श्वेताने रितसर लेखी तक्रार भरोसा सेलला केली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी त्याला भरोसा सेलमध्ये बोलावले. जयमाला बारंगे यांनी डॉ. सुनीलचे समूपदेशन केले. तो प्रेमप्रकरण असल्याचे मान्य करीत नव्हता. शेवटी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता सत्य स्थिती उघडकीस आली. त्यामुळे डॉ. सुनीलने चारही तरुणींशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. त्या चारही तरुणींची पोलिसांनी समजूत घातली. त्या तरुणींनीही डॉ. सुनीलचा नाद सोडला तर त्यानेही प्रेमसंबंध संपविण्याचे वचन पत्नीला दिले. भरोसा सेलच्या प्रयत्नाने दोघांचाही सुखी संसार पुन्हा फुलला.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments