समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
30-10-2024
देसाईगंज: वीज वितरण विभागाकडे लोंबकळणाऱ्या विद्युत तारांबाबत वारंवार तक्रार करूनही याकडे कमालीचे उदासीन धोरण दाखविल्या गेल्यामुळे १३ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाच्या दिवशी रवी गोविंद राऊत (३७) रा. गवराळा या इसमाचा लोबकळणाऱ्या विजेच्या तारात अडकून मृत्यू ओढावला होता. या मृत्यूस सर्वस्वी वीज वितरण विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतप्त जनतेकडून होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, वडसा आमगाव या बायपास मार्गावर गेल्या वर्षभरापासून सावंगी येथून आलेल्या ३३ केव्ही विद्युत लाइनच्या तारा लोंबकळत होते. याबाबतची सूचना आमगाव येथून अनेकदा देसाईगंज वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलो होती. मात्र वर्ष लोटनही हायहोल्टेज असलेल्या तारा लोंबकळत असलेल्याच स्थितीत ठेवण्यात आल्या. यामुळे दुर्दैवाने यात रवी राऊत या निरपराध व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर सर्वचस्तरावरून रोष व्यक्त होतआहे.
वर्षभरापासून लोंबकळत असलेल्या तारांचा विषय सध्या चांगलाच तापला असून मोठा तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ३३ केव्ही वीज वाहिनीवर उपकार्यकारी अभियंता पदावरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. वीज वाहिनी वर्षभरापासून लोंबकळत असल्याची सूचना नजीकच्या आमगाव गावातून अनेकदा देण्यात आली. मात्र. कामचोर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच एका निरपराध इसमाचा जीव गेला. गावकऱ्यांच्या अज्ञानतेचा फायदा घेत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संगनमत करून याला अपघाताचे वर्णन दिल्याचा आरोप जनतेकडून होत आहे.
हा अपघात नसून बीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंतांच्या निष्काळजीपणाचे पाप असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे बेजबाबदारीचा कळस गाठणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments