समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
27-10-2024
गडचिरोली : येथील विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना भाजपा पक्षाने उमेदवारी नाकारल्याने संपूर्ण क्षेत्रात भाजपा कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये नाराजीचा सूर असून विधानसभा क्षेत्रातील अनेक भाजपा पक्षाचे पदाधिकारी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे रविवार (२७ ऑक्टोबर) रोजी राजीनामे देणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या अंतर्गत पोटात एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गडचिरोली क्षेत्राची उमेदवारी डॉ. मिलिंद नरोटे यांना जाहीर केली. मात्र, गेल्या दहा वर्षात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी
या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विविध विकासात्मक कामे केल्याने त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा झाला होता. शेवटपर्यंत त्यांना भाजपाची तिकीट मिळेल असेच बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी भाजपाकडून गुरुवारी १० ते १२ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता. विशेष म्हणजे आ. डॉ. देवराव होळी यांच्या सोबतीला उमेदवारी अर्ज सादर करताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ त्यांना एबी फॉर्मची वाट होती, अशातच
आजच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच नाराजीचा सूर दिसून आला, याचा प्रत्यय म्हणून भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली असून या बैठकीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांसह अनेक भाजपा पक्षाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख हे सुद्धा भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पूर्णपणे आ. डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. विद्यमान आमदारांची तिकिट कापल्याने भाजपातील डॉ. होळी समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments