RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
14-09-2024
धानोरा : गणेश विसर्जनासाठी जाताना भरधाव कार पुलाच्या कठड्यास धडकून एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना १० सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धानोरा- मालेवाडा रोडवरील सुरसुंडीजवळ घडली.
बबलू पठाण (वय ४४, रा. धानोरा ) असे मृताचे नाव असून गोपीदास चौधरी (वय ४५, रा. धानोरा) हे जखमी आहेत. मित्राच्या घरी खांबाळा येथे गणपती विसर्जनासाठी गडचिरोली येथील दोघे व धानोरा येथील दोघे असे चौघे मित्र कारमधून (एमएच १६ एजे ३४४१) जात होते. सुरसुंडीजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्यावर आदळली. यात मागे बसलेले बबलू पठाण यांच्या
हीच ती अपघातग्रस्त कार. छातीला मुकामार लागला तसेच गोपी चौधरी यांच्या हाताला व कंबरेला दुखापत झाली. इतर दोघे सुरक्षित आहेत. जखमी दोघांनाही धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन बबलू पठाण यांना मृत घोषित केले तर गोपी दासला पुढील उपचाराकरिता ब्रह्मपुरी येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. धानोरा पोलिस अधिक तपास करत आहेत.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments