ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
11-09-2024
कॅलिफोर्नियाः अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील वरीष्ठ सभागृहाच्या सदस्या (सेनेटर) मेरी अल्वाराडो-गिल यांनी पुरुष कर्मचाऱ्याकडून लैंगिक सुखाची मागणी करत बळजबरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लैंगिक सुखाची मागणी केल्यानंतर माझ्या पाठीला आणि मणक्याला दुखापत झाली, असा दावा गिल यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ चाइ कँडीट यांनी केला आहे.
माजी सिनेट सदस्य गॅरी कँडीट यांचा मुलगा असलेल्या चाड कँडीट यांनी आता याबद्दल कायदेशीर खटला दाखल केला असून प्रवासादरम्यान गिल लैंगिक सुखाची मागणी करत असत, असा आरोप केला आहे. यावर गिल
यांच्या वकिलानेही प्रत्युत्तर दाखल केले असून कँडीट यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सॅक्रामेंटो सुपीरियर न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानुसार, कँडीट यांनी दावा केला की, नोकरी टिकविण्यासाठी त्यांनी गिल यांच्या लैंगिक सुखाच्या मागणीची प्रतिपूर्ती केली. मेरी अल्वाराडो गिल या पूर्वी डेमोक्रॅट पक्षात होत्या, आता त्या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या आहेत. मेरी अल्वाराडो- गिल यांच्याविरोधात दाखल
केलेल्या खटल्यात कँडीट यांनी असाही दावा केला की, गिल यांनी कार्यालयात दहशतीचे वातावरण तयार केले होते. तसेच आपले शेवटचे भांडण झाले, तेव्हा गिल यांनी एका छोट्याश्या गाडीत माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. ज्यामुळे माझ्या पाठीला जबर दुखापत झाली आणि ज्यामुळे माझ्या तीन हाडांना मार बसला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात कँडीट यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. पाठीच्या दुखापतीचे कारण देत त्यांनी गिल यांच्या मागणीला नकार दिला होता, म्हणून ही कारवाई झाली, असे ते म्हणाले. तसेच नोकरीवरून काढून टाकण्याआधी गिल यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत कँडीट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती.
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments