संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
11-09-2024
प्रधानमंत्री आवास योजना : टुमदार घराचे स्वप्न होणार पूर्ण
गडचिरोली तब्बल तीन वर्षांनंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात २०२४- २५ या एकाच वर्षात गडचिरोली जिल्ह्याला सुमारे १४ हजार ५५२ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आजपर्यंतचे हे सर्वाधिक उद्दिष्ट आहे. प्रशासन लाभार्थ्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याच्या कामाला लागले आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबाचे पक्के घर असावे या उद्देशाने केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सुरू केली. या योजनेंतर्गत जवळपास चार वर्षे नागरिकांना घरे बांधण्यासाठी निधी देण्यात आला. त्यानंतर २०२१-२२ पासून या योजनेचे उद्दिष्टच प्राप्त होणे बंद झाले होते.
परिणामी राज्य शासनाने राज्यातील ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना २०२३-२४ मध्ये सुरू केली. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना पुन्हा सुरू होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र २०२४-२५ चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे एकाच वर्षात सुमारे १४ हजार ५५२ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत जिल्ह्याला मिळालेल्या घरकुलांच्या उद्दिष्टात यावर्षी सर्वाधिक घरकुले आहेत. त्यामुळे बहुतांश कुटुंबांचे स्वतःच्या टुमदार घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
एकूण घरकूल १४,५५२
तालुकानिहाय मंजूर घरकुल
कोरची ७४९
मुलचेरा४९८
देसाईगंज ५०३
कुरखेडा २,०७२
धानोरा १,६९०
चामोर्शी २,१५६
गडचिरोली १,३१०
सिरोंचा १,३३८
अहेरी १,८६६
एटापल्ली १,१८६
आरमोरी ८३२
भामरागड ३५२
मागील वर्षीपेक्षा दुप्पट घरे
मोदी आवास योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात ६ हजार ५४८ घरे मंजूर करण्यात आली होती. मागील वर्षींपेक्षा यावर्षी दुप्पट घरे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पुढील दोन महिन्यांत घरकुल बांधकामाची लगबग दिसून येणार आहे.
मोदी आवासच्या रखडलेल्या हप्त्यांचे काय?
राज्य शासनाने सुरू केलेल्या मोदी आवास योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांना पहिलाच हप्ता मिळाला आहे. पुढचे हप्ते न मिळाल्याने अनेकांची घरे अपूर्ण आहेत. तर काही जणांनी कर्ज काढून घरे बांधली आहेत. सदर नागरिक आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निधी नव्हता तर घरे का मंजूर केली, असा प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. निधीअभावी ६ हजार ५४८ मंजूर घरांपैकी केवळ २ हजार ९४२ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर ३ हजार ६०६ घरांचे काम अर्धवट आहे.
यादी प्रकाशित, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू
• प्रत्येक गावनिहाय लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतनिहाय जाहीर करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांची नावे आहेत. त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करायची आहेत. त्यासाठी लाभार्थी व प्रशासनही कामाला लागले आहे.
• शासनाने दिलेल्या विहित कालावधीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कागदपत्रे लवकरात लवकर जमा करण्याच्या सूचना लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments