नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
02-09-2024
पोळ्याच्या झडत्या - १*
बैना ओ बैना, लाडाची बहिणा
लाडाच्या बहिणीला पंधराशे महिना
पंधराशे रुपयाचे खावा गोलगप्पे
लाडाच्या भावाला द्या ठपाठप ठप्पे
मायबाप सरकार म्हणते लाडाची बैना
पाटलाची पाटी उरली जावयाची दैना
लाडाच्या बहिणीच्या नवऱ्याचे हाल
कुत्रंबी हुंगत नाही शेतातला माल
तुर केली आयात, पाडून टाकले भाव
स्वस्तामध्ये सोयाबीन, लुटून नेलं गाव
जावयाच्या छाताडावर कर्जाची रास
पंधराशेत जहर घ्यावं की घ्यावा गळफास
जरांगे म्हणतात ते खरं आहे भाऊ
घामाचं दाम नाही तर
अभय आरक्षणच घेऊ
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या - २*
हेला रे हेला, राजकारणी हेला
सरकारच्या धोरणापायी
शेतकरी मेला
शेतकरी मेला तर
लाख रुपये देते
जिवंत जगतो म्हणाल तर
खमसून रक्त पेते
शेतमालाला भाव नाही तर
आरक्षण तरी द्या
तुमच्या हिश्याच्या नोकऱ्या
आमच्या लेकराले द्या
प्रेमानं दिलं नाही तर
हिसकून घ्या आता
नव्या दमानं लिहू अभय
शेतकऱ्याची गाथा
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
*पोळ्याच्या झडत्या - ३*
पोयी रे पोयी पुरणाची पोयी
पवारांच्या पालखीला उद्धवचे भोई
शिंदेसेनेच्या घोड्यांना
भाजप घालते चारा
दादाच्या घड्याळात
वाजून गेले बारा
कपाळावर नाही उरली
निष्ठेची टिकली
खुर्चीसाठी साऱ्यांनीच
लाज शरम विकली
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
*पोळ्याच्या झडत्या - ४*
वाडा रे वाडा इंद्राचा वाडा
भाजपच्या चड्डीले उद्धवचा नाडा
भाजपने सोडली उद्धवची साथ
तर भाजपचाच झाला सुफडासाफ
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
*पोळ्याच्या झडत्या - ५*
नवं नवं सरकार नवी नवी थीम
नवी नवी योजना नवी नवी स्कीम
लाडाचा भाऊ लाडाची बहीण
लाडाचा ब्याही लाडाची विहीन
मत द्या आम्हाले
सारं फुकट तुम्हाले
धान्य फुकट, तेलबी फुकट
धोतर फुकट, चोळीबी फुकट
नवऱ्याले एक एक बायको फुकट
बायकोले एक एक नवरा फुकट
फुकट फुकट फुकट
फुकट फुकट फुकट
जोडप्याले दोन दोन लेकरं बी फुकट
मत द्या आम्हाले
सारं फुकट तुम्हाले
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
*पोळ्याच्या झडत्या - ६*
माशी रे माशी,
गांधीलची माशी
शेतकऱ्याच्या नाकात
घुसली गोमाशी
मोदीभाऊ म्हणे
मी काढू कशी
राहुलभाऊ म्हणे
राहू दे तशीच
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
पोळ्याच्या झडत्या - ७*
कॅटली रे कॅटली, दुधाची कॅटली
दुधावरची साय सांगा कोणी चाटली?
शेतमालाले भाव म्हणलं तर
सरकारची चड्डी
मांडीवर फाटते
वेतन आयोगावर सरकार
जम्मुन खिरापत वाटते
उद्योगांचे अरबो खरबो
कर्ज झटक्यात माफ करते
हजाराच्या कर्जासाठी
इकडे शेतकरी मरते
घोरसून सांगा लोकहो
शेतमालाले भाव दे
नायतर
आरक्षण दे जरा
जमत असण तर जमव
नायतर
घ्या म्हणा झोलाझेंडी
अन्
व्हा आपल्या घरी
बोला! एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
=
पोळ्याच्या झडत्या - १
वाडा रे वाडा,
शेतकऱ्याचा वाडा
शेतकऱ्याच्या वाड्यात
चांदीचा गाडा
चांदीच्या गाड्यावर
सोन्याचे मोर
मोरावर बसते
शेतकऱ्याचं पोर
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
=-=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या - ३*
आटली रे आटली
तिजोरी आटली
सरकारची चड्डी
मंधामंधी फाटली
फाटलेल्या चड्डीले
ठिगळ काही बसेना
कांदे, टमाटर, सोयाबीनले
काळं कुत्रं पुसेना
इंडिया गेला चंद्रावर
भारताची झाली माती
आगुदर दे आमच्या शेतमालाले भाव
तवा सांग तुही छप्पन इंची छाती
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments