ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
24-08-2024
नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद
वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार
समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त
मुंबई, दि.२३: नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली.
सुमारे ४३ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बस मध्य नेपाळमधील मर्त्यांगडी नदीत कोसळल्याने जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील २६ जण ठार तर १६ जखमी झाले आहेत. एक जण बेपत्ता आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर नोंदणीकृत असलेली ही बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती. तनहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरातील ऐना पहारा येथे महामार्गावरून जात असताना ती अचानक नदीत कोसळली. पोखराहून काठमांडूला जात असलेल्या भारतीय पर्यटक बसमध्ये सुमारे ४३ भारतीय होते, असे भारतीय दूतावासाने एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. गुरुवारी रात्री ११.३० वाजता हा अपघात झाल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. बसमध्ये सर्व ४३ प्रवासी महाराष्ट्रातील होते.
सशस्त्र पोलिस दल (एपीएफ) पोलिस उपअधीक्षक शैलेंद्र थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून २६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर १६ जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. केसरवानी ट्रॅव्हल्सच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसमधे जळगावमधील प्रवासी आहेत. मृतांमध्ये त्यांचा समावेश आहे. देवदर्शन करण्यासाठी भाविक गेले होते. ११० जणांच्या ग्रुपने गोरखपूरवरुन तीन बस केल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.
००००
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments