समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
21-08-2024
युवती मारहाण प्रकरण : आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
आरमोरी येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मंगळवारी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
गडचिरोली: मोबाईल चार्जरकरिता युवकांनी रेस्टॉरंटमध्ये धुडगूस घालून तेथे काम करीत असलेल्या १९ वर्षीय मुलीला अमानुष मारहाण केली होती. १५ ऑगस्टला घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद २० ऑगस्टला उमटले. या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनी शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीला सोहेल शेख, अयुब शेख यांनी मोबाईल चार्जरसाठी अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सार्वत्रिक होताच जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फरार आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली; परंतु या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी २० ऑगस्टला विविध संघटनांनी मिळून आरमोरी बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान नागरिकांनी हजारोंच्या
संख्येने एकत्र येत आरोपी विरोधात घोषणा देत इंदिरा गांधी चौकात निषेध मोर्चा पोहोचला त्यानंतरच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या नावे निवेदनही देण्यात आले. मात्र, यानंतरही शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला. यावेळी पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरील दरवाजा बंद करून आत जाण्यापासून मोर्चेकऱ्यांना रोखले. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
यावेळी आ. कृष्णा गजबे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजप तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, नंदू पेट्टेवार, भारत बावनथडे, विलास पारधी, अक्षय हेमके, काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके, विजय सुपारे, सागर मने, भूषण सातव, राजू अंबानी, संदीप ठाकूर, लक्ष्मी मने, वेणूताई ढवगाये, डॉ. संगीता राऊत, अर्चना गोंधोळे, विद्या चौधरी, योजना मेश्राम यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
आरमोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे आरमोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षक विनोद रहागंडले हे हद्दीत दारूविक्रीबाबात कडक धोरण असल्याचा दावा करीत असले तरी सर्रास दारूची विक्री सुरू आहे. मुलींच्या छेडछाडीच्याही तक्रारी आहेत.
युवतीला भररस्त्यातील रेस्टॉरंटमध्ये अमानुष मारहाण
करण्याची हिंमत दाखवून आरोपींनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाणेदार रहांगडले कार्यपद्धतीत सुधारणा करतील का, असा सवालही यावेळी आंदोलकांनी केला.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments