STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
25-09-2024
Ladki bahin yojana: राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजघडीला प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यांना दरमहा आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, या योजनेचा गैरफायदा घेण्याचे काही धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
अकोला जिल्ह्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. 6 पुरुषांनी खोटी कागदपत्रं सादर करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण 'नारीशक्ती दूत' अॅपद्वारे उघडकीस आले आहे, जिथे या सहा जणांनी अर्ज भरले होते. अर्जाच्या तपासात, या व्यक्तींनी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले, आणि यानंतर त्यांच्या आधारकार्डवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेबद्दल अकोला जिल्ह्यातील महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
यापूर्वी अजित पवार यांनी साताऱ्यातील एका व्यक्तीचा उल्लेख केला होता, ज्याने खोटी माहिती भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. अकोल्यातील घटना देखील तशाच प्रकारची असून, या सहा पुरुषांनी महिलांसाठी असलेल्या योजनेचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पात्र महिलांनी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत, आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण 29 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments