RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
03-08-2024
Energy Drinks: मित्रांनो गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मुलांमध्ये एनर्जी ड्रिंक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पण, या एनर्जी ड्रिंकमध्ये केमिकलचे बरेच प्रमाण असल्यामुळे मुलांना हृदयविकाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे एनर्जी ड्रिंकचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
एनर्जी ड्रिंक्सच्या सुरक्षिततेबाबत नियमनाचा अभाव आहे. तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठी या पेयांचे मार्केटिंग केले जाते. एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेल्या घटकांपैकी कॅफेन हा सर्वांत सामान्य घटक असल्याने त्याचे दुष्परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ड्रिंक्समध्ये असलेले cafen हे एकाग्रता आणि सतर्कता वाढविण्यासाठी आहे. पण या कॅफेनमुळे अस्वस्थता, हृदयाचा धोका वाढणे आणि त्या सोबतच निद्रानाश यासारख्या काही लक्षणे उद्भवू शकतात. कॅफेनच्या अती जास्त डोसमुळे हायपरटेन्शन, पल्पिटेशन, कॅल्शिअमची कमतरता शरीरात निर्माण होणे या सोबतच अनेक समस्या होऊ शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
एनर्जी ड्रिंक्सचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते, हृदय व रक्तवाहिन्यांवर खूप वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
शहरी भागातील मुले व युवकांमध्ये एनर्जी ड्रिंकची क्रेझ अलिकडे वाढली आहे. अनेकजण मेडिकल स्टोअर्समधून नेत आहेत.
एनर्जी ड्रिंकमध्ये प्रमाणापेक्षा साखर व कॅफेन समाविष्ट आहे. याचा सेवन करणाऱ्याच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. शाळेत जाणारे मुले व लहान बालकांनी एनर्जी ड्रिंकचा नाद सोडून द्यावे. त्याऐवजी फळे व पौष्टिक आहार घ्यावा, जेणेकरून मुलांची शक्ती वाढण्यास मदत होईल.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments