बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
14-10-2024
Gadchiroli News: गडचिरोलीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि Rural and Urban Development Youth Association (RUDAY) संस्थेचे कार्यकारी संचालक काशिनाथ देवगडे Kashinath Deogade हे लवकरच भारताचे प्रतिनिधित्व करत श्रीलंकेत एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत 'Climate Change and its Impact on the Livelihoods of Vulnerable Communities Living Below the Poverty Line' या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली जाणार आहे.
या परिषदेत देवगडे यांना 'हवामानातील बदल आणि सामाजिक संस्थांची भूमिका' या विषयावर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी यापूर्वीही जपान, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, नेपाल, मलेशिया, फिलिपाइन्स, आणि कम्बोडिया या देशांमध्ये होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले मार्गदर्शन केले आहे.
या सेमिनारचे आयोजन जपान एशियन असोसिएशन अॅण्ड एशियन फ्रेन्डशिप सोसायटी (जाफ्स) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. जाफ्स ही सामाजिक संस्था आशिया खंडातील 18 देशांमध्ये कार्यरत असून, दरवर्षी एका देशात आंतरराष्ट्रीय नेटवर्क सेमिनारचे आयोजन करते. यावर्षी श्रीलंकेत होणाऱ्या या सेमिनारमध्ये काशिनाथ देवगडे यांच्या सहभागामुळे भारताच्या प्रतिनिधित्वाला एक नवा आयाम मिळणार आहे.
श्री. काशिनाथ देवगडे यांचा मुलगा रजत देवगडे Rajat Deogade यांची अलीकडेच अमेरिकेतील नामांकित शिकागो विद्यापीठामध्ये ‘मास्टर ऑफ पब्लीक पॉलिसी’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. शिकागो विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अकराव्या क्रमांकावर आहे, आणि रजत देवगडे माहे सप्टेंबरमध्ये अमेरिकेला रवाना झाले आहेत. देवगडे कुटुंबीयांतील या शैक्षणिक यशामुळे त्यांचा समाजात गौरव केला जात आहे.
श्रीलंका येथे होणाऱ्या या परिषदेकरिता काशिनाथ देवगडे यांची वक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल अनेक सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments